या तारखेपासून देशात लसीकरणाला होणार सुरवात..!

| नवी दिल्ली | देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दुसर्‍या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त व तिसर्‍या टप्प्यात गंभीर आजाराने ग्रस्त 50 वर्षाखालील लोकांना लसी दिली जाईल. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात सुमारे 27 कोटी लोकांची लसीकरण होईल.16 जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होत आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात शनिवारी उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. ज्यामध्ये लसीकरणाच्या अंतिम तारखेची घोषणा करण्यात आली. या बैठकीत कॅबिनेट सेक्रेटरी, पंतप्रधानांचे प्रधान सचिव व आरोग्य सचिव यांच्याव्यतिरिक्त इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोहरी, मकर संक्रांती पोंगल यासारखे सण पाहता 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 79 लाख लाभार्थ्यांनी कोविड ऍपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केलं आहे. ज्यांना लसीकरणाच्या सुरूवातीला लस देण्यात येणार आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यावर डिजिटल पद्धतीने परीक्षण केले जाईल. यासाठी करनाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 4 लस स्टोअर देखील तयार करण्यात आले आहेत. शिवाय संपूर्ण देशात 37 लस स्टोअर तयार करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.