पन्नास लाखाच्या विम्याची मुदत वाढवावी-आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांची मागणी

| जळगाव | गेल्या वर्षभरापासुन कोरोनाच्या संकटामुळे सारे जग चिंतातुर झालेले आहे. कोरोनाकाळात फ्रंट लाईन वर्कर म्हणुन आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्वच्छतादुत, महसुल विभाग, ग्रामविकास विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी विभाग आदी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र सेवा देऊन कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वरील सर्व फ्रंट लाईन वर्कर स्वतःचा प्राण धोक्यात घालुन हे कार्य करीत असतांना आजवर अनेक कोरोना योद्धे शहीद झालेले आहे.

अशा शहीद झालेल्यांसाठी महाराष्ट्र शासनाने दि. 25 मे 2020 रोजी शासन आदेश काढुन 30 सप्टेंबर 2020 पर्यत कोरोना काळात मृत झालेल्या फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी पन्नास लाखाचे विमा कवच संरक्षण दिले होते. त्यानंतर 14 आँक्टोबर 2020 रोजी पुन्हा शासन आदेश काढुन 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली होती. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. परंतु आता हा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कालच आमचा एक आरोग्य सेवक कोरोनामुळे मृत्यु पावले आहे. त्यामुळे सदर विमा कवच योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी गोंडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी केली आहे.

याबाबतीत अधिक माहीती देतांना सोनार यांनी सांगितले की कोरोनाचे जोपर्यंत समुळ उच्चाटन होत नाही. तोपर्यंत विमा सुरक्षा कवच देण्यात यावे, तसे आजवर जे अधिकारी व कर्मचारी मृत पावले आहे. त्यांच्यापैकी अनेकांना हा लाभ मिळालेला नाही. तो लाभही त्वरीत देण्यात यावा. याबाबतीत मी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे, अशी माहीती सोनार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *