पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!


| पारनेर | शासनाने बैलगाडी शर्यतीला नुकतीच परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा शर्यत जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात गावोगावी या स्पर्धा सुरू असून बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.

पारनेर तालुक्यामध्ये गारगुंडी या ठिकाणी रोकडेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्ताने भव्यदिव्य बैलगाडा शर्यत गावातील तरुण मित्रमंडळी यांनी आयोजित केली आहे. गावातील या तरुणांनी एकत्र येत यंदा ही स्पर्धा भरविण्याचा मानस सोडला आणि त्यानुसार मेहनत घेत सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. घाट बनवून तयार असून येत्या १ जून रोजी या स्पर्धा गारगुंडी गावात दिमाखात संपन्न होणार आहेत.

गावचे सुपुत्र सुनील फापाळे यांच्याकडून ४१ हजार रुपयांचे पाहिले बक्षीस देण्यात येणार असून दुसरे ३१ हजारांचे बक्षीस गावातील शिक्षक तसेच सैन्य दलातील नोकरदार मंडळी देणार असून तुकाराम झावरे यांच्याकडून २१ हजारांचे तिसरे बक्षीस असणार आहे. तसेच फळीफोड गाड्यास, फायनल मधील गाड्यांना, घोड्यांच्या शर्यती यांना देखील विविध बक्षिसे तसेच ट्रॉफी देण्यात येणार आहेत.

गावातील उल्हास निवृत्ती झावरे, अक्षय भिकाजी झावरे, संतोष फापाळे, गणेश झावरे, रियाझ शेख, हरीश झावरे आदी तरुण मंडळींनी यासाठी पुढाकार घेतला असून गावातील सरपंच सौ. प्रमिला फापाळे, उपसरपंच प्रशांत झावरे तसेच बाबाजी फापाळे, लहानू झावरे, अप्पा ठुबे, निवृत्ती झावरे, विलास झावरे आदींनी तरुणांच्या या संकल्पाला बळ दिले आहे. या शर्यतींना लोकनेते आमदार निलेश लंके, भाजपचे विश्वनाथ कोरडे, शिवसेनेचे काशिनाथ दाते, सुजित झावरे, ॲड. आझाद ठुबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published.