| पारनेर | पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील सुपुत्र व ठाणे जिल्हातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.
नवनाथ ढवळे 2015-2017 या काळात गडचिरोली जिल्हा पोलीस दलात ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमा यशस्वी केल्या. त्यातील मे 2016 मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात नवनाथ ढवळे यांनी त्यांच्या टीमने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी आणि तिच्या सोबत सहा वरीष्ठ नक्षलींचा खत्मा केला. ही चकमक तब्बल 12 तास सुरु होती. श्री. ढवळे आणि त्यांच्या सहकार्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले अाहे.
मूळ अहमदनगर जिल्ह्यातील वडझिरे या गावातील असलेल्या नवनाथ ढवळे यांनी गडचिरोली, कराड, चिपळूण याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून काम करत आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले कामही लक्ष्यवेधी ठरले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .