| प्रकाश संकपाळ/ पेण | पेण येथील मळेघर आदिवासी वाडीतील चिमुरडीवर केलेल्या बलात्कारी नराधमाला भर चौकात फासावर लटकून भविष्यात पुन्हा असे नराधम जन्माला येणार नाहीत असा कायद्याचा धाक व वचक बसेल असा शक्ती कायदा अंमलात आणावा म्हणजे बलात्कारासारखे प्रकार करण्याचे धाडस नराधम करणार नाहीत.
कळी उमलण्यापूर्वीच कुस्करून टाकणाऱ्या या नराधमावर लवकरात लवकर कठोर कारवाई करून पीडित चिमुरडीला न्याय मिळावा म्हणून राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकुर याची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात असे कृत्य करणाऱ्या नराधमांना शक्ती कायद्यांतर्गत लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली आहे तसेच दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार, हुंडाबळी व बलात्कार याबाबत देखील राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या प्रसंगी दुर्गा फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा शोभा भोईर, नवी मुंबई सचिव रसिका म्हात्रे व ठाणे जिल्हाध्यक्षा अक्षता केणी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.