पोलीस अधिकारी बन्सी कांबळे यांनी जपले सामाजिक भान, वाढदिवसानिमित्त केले हे स्तुत्य काम..!

| नाशिक | प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस ही एक पर्वणी असते ते साजरे करण्याचेही अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत. तर वाढदिवसादिवशी समाजातील जबाबदार घटक आपल्या आचरणातून कायमच समाजाला आदर्शाचे बीज देत असतात. अश्याच प्रकारे समाजाचे आपण देणं लागतो हे मनाशी पक्के ठरवलेले पोलीस अधिकारी बन्सी कांबळे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

जय गणेश बहुउद्देशीय संस्था, कुर्डू, माढा या अनाथ मुलींसाठी काम करणाऱ्या संस्थेला ५१ हजार रुपयांची मदत करत त्यांनी संस्थेच्या कन्यादान योजनेला वाढदिवसानिमित्त हातभार लावला. सध्या संस्था कोरोनामुळे आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांवर देखील काम करत आहे. या उत्तम सामाजिक कार्याला बन्सी कांबळे यांनी हातभार लावून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.

बन्सी कांबळे हे सातत्याने सामाजिक कामात अग्रेसर असतात. समाजभान, जालना तसेच मराठीमाती प्रतिष्ठान, ठाणे यांच्या सोबत देखील ते कित्येक सामाजिक मोहिमेत सातत्याने सहभागी होत असतात. यापूर्वी सांगली पुर, शेतकरी आत्महत्या कुटुंब पालकत्व, आदिवासी भागात जीवनावश्यक वस्तू वाटप आदी अनेक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वाढदिवसाच्या त्यांच्या या सामाजिक कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *