पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने पोलीस भरतीचा GR केला रद्द..!

| मुंबई | महाविकास आघाडी सरकारने विरोधानंतर पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर अखेर रद्द केला आहे. मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, पोलीस भरतीत SEBC विद्यार्थ्यांना EWSचा लाभ मिळणार आहे.

पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने ४ जानेवारी रोजी काढलेला जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग आता नवीन जीआर काढणार आहे.

४ जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. त्याविरोधात तक्रार झाल्यानंतर आता गृहविभाने तो निर्णय रद्द केला असून नवा निर्णय जारी केला जाणार आहे. त्यानुसार पोलीस भरतीत एसईबीसी अतंर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस अतंर्गत भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *