| मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांचं संपूर्ण जीवन हे प्रत्येकासाठी आदर्श आहे. महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून मिळणार आहे.
विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे हा एक वर्षाचा कोर्स सुरू करण्यात येत आहे. महत्वाची या अभ्यासक्रमासाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज : व्हिजन एँड नेशन बिल्डिंग’ असे आहे.
असा असेल अभ्यासक्रम?
महाराजांची 50 वर्षांची कारकिर्द विविध घटनांनी भरलेली आहे. याचा आढावा अनेक पुस्तकांतून मांडला आहे. यामध्ये महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे दिले जाणार आहे. या सगळ्याचे बारकावे अभ्यासक्रमात आहेत. हा अभ्यासक्रम दोन सहामाही सत्रांमध्ये विभागला आहे.
प्रत्येक सत्रात चार विषय असे एकूण आठ विषयात अभ्यासक्रांची विभागणी केली आहे. प्रत्येक विषयाला चार क्रेडिट आणि शंभर गुण देण्यात आला आहे. एकूण 32 क्रेडिट आणि 800 गुणांचा अभ्यासक्रम आहे.
14 जूनपासून या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. चार जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
✓ अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात शिकवले जाणार हे विषय :
• युद्धशास्त्र व युद्धनीती
नीतीकार, प्रॅक्टिकल कंपोनेंट एँड रिसर्च मेथडॉलॉजी
✓ अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शिकवले जाणार हे विषय
• शिवाजी महाराजांचे आरमार
• प्रशासन
• फील्ड व्हिजिट एँड प्रोजेक्ट रिपोर्ट
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .