
| पुणे | वडगाव शेरी येथील प.पू. प्रीतिसुधाजी, प.पू. मधुस्मिताजी यांच्या प्रेरणेने, तसेच श्री महावीरजी नहार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील ३६ जैन संघांच्या उपस्थितीत १९ सप्टेंबर या दिवशी सुसंस्कार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सर्व संघप्रमुखांच्या स्वाक्षरीसहित ‘प्री वेडिंग शूटिंग’ची (विवाहापूर्वी जोडप्यांचे केले जाणारे छायाचित्रण) हानीकारक प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ज्या कुटुंबांमध्ये अशा पद्धतीने विवाह होत असेल, त्या विवाहाचा समाजातील मुख्य पंच निषेध करतील आणि विवाहामध्ये सहभागी होणार नाहीत, असा ठराव संमत करण्यात आला. या वेळी जैन संघाचे प्रमुख श्री. विजयकांतजी कोठारी, श्री. पोपटलालजी ओस्तवाल, प्रा. अशोकजी पगारिया, श्री. चंद्रकांतजी पगारिया उपस्थित होते.
‘प्री वेडिंग शूटिंग’ म्हणजे विवाहापूर्वी जोडप्यांचे केलेले छायाचित्रीकरण ! हे छायाचित्रीकरण सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसारित केले जाते. यातून मुलींचे प्रदर्शनच मांडले जाते. ही प्रथा अयोग्य असून तिचा अपलाभही घेतला जाऊ शकतो. त्यामुळे ही हानीकारक प्रथा बंद करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..