आशिष कुडके :- पृथ्वीराज चव्हाण : महाविकास आघाडीचा साताऱ्याच्या जागेचा तिढा सुटता सुटेना असं चित्र पपहायला मिळत आहे. सातरा लोकसभा निवडणुकीबाबत काही केल्या तोडगा निघत नाही. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
तर, काँग्रेसच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका असल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटलांनी दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांच्या त्यांच्या घरी जात भेट घेतली होती. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मविआचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याचं खंडण पृथ्वीराज चव्हाणांनी स्वत: केले आहे.
मला सेवानिवृत्त हा शब्द आवडत नाही. मी सेवा निवृत्त होणार नाही असं खासदार उदयनराजेंनी म्हटलंय. एका शिक्षकाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात लोकसभा लढवण्याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले. उदयनराजे यांनी शिक्षक आर. वाय. जाधव सेवापुर्ती यांचा जाहीर सत्कार केला
त्यावेळी स्टेजवर बोलत असताना मला सेवानिवृत्ती शब्द आवडत नाही. मी इथं कार्यक्रमाला आलोय एवढंच लक्षात ठेवा. म्हणत राजकारणातून सेवानिवृत्ती न होण्यावर ठाम असल्याचे उदयनराजेंनी सांगितलं. यावेळी एकच हस्या पिकला.
शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.. ज्योती मेटे बीडमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.. त्यासंदर्भात त्यांनी पवारांसोबत चर्चा केली.. चर्चा अंतिम टप्प्यात झाली असून लवकरच निर्णय अपेक्षीत असल्याची माहिती त्यांनी दिली..