पाक्षिक रयतेचा वाली अंकाचे प्राजक्त झावरे पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन..!

| अहमदनगर | पाक्षिक रयतेचा वाली अंक ०७ चे प्रकाशन दैनिक लोकशक्ती ऑनलाईन न्यूज पोर्टलचे संपादक श्री. प्राजक्त झावरे पाटील यांच्या शुभहस्ते दि.०१ जानेवारी २०२१ रोजी पार पडले. यावेळी रयतेचा वाली परिवारातील सदस्य ऑनलाइन उपस्थित होते.

राज्यभरातील शाळेतील उपक्रम, शिक्षकांचे प्रेरणादायी काम इतरांपर्यंत पोहचावे, यासाठी दर पंधरा दिवसातून रयतेचा वाली पाक्षिक प्रकाशित होते. यात अनेक नाविन्यपूर्ण लेख असतात. या पाक्षिकाचे संपादक श्री.शाहू भारती सर असून कार्यकारी संपादक म्हणून श्रीम. सुनिता इंगळे (सूर्यवंशी) आहेत. पाक्षिकाची मांडणी व डिजाईन श्री. नवनाथ सूर्यवंशी यांनी केली आहे.

व्हाटसअप समूहाच्या माध्यमातून १ जाने २०२१ रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला श्री. प्राजक्त झावरे पाटील यांच्या हस्ते पाक्षिक प्रकाशित करण्यात आले. प्राजक्त झावरे पाटील हे दैनिक लोकशक्ती ऑनलाईन न्यूज पोर्टल चे संपादक असून, एक्का फाउंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठान, ठाणे चे अध्यक्ष तसेच पारनेरकर युवा विकास मंचचे ते विश्वस्त आहेत. हे पाक्षिक अत्यंत दर्जेदार झाले असून यात २४ लेख देण्यात आले आहे. त्यातून विविध माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अशी माहिती रयतेचा वाली च्या कार्यकारी संपादक श्रीम.सुनिता इंगळे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *