आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांनी विजेंदरला सदस्यत्व देत पक्षात त्याचं स्वागत केलं. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. विजेंदर सिंहच्या येण्याने पक्ष आणखीन मजबूत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. विजेंदरला बॉक्सिंगमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
दरम्यान विजेंदरने ही आपली घरवापसी असल्याचं सांगितलं आहे. “ही एका प्रकारे माझी घरवापसी आहे. मला फार बरं वाटत आहे. देश-विदेशात खेळाडूंचा सन्मान वाढला आहे. भाजपा सरकार आल्यापासून खेळाडूंसाठी अनेक गोष्टी सहज झाल्या आहेत. मी चूकला चूक आणि योग्यला योग्य म्हणणार”