देशात सर्वाधिक लोकांचे प्रवास करण्याचे साधन भारतीय रेल्वे आहे. अनेक वेळा आरक्षण न मिळाल्यामुळे किंवा जवळचा प्रवास असल्यामुळे काही जण सामान्य तिकीट (जनरल तिकीट) काढून प्रवास करतात. परंतु रेल्वे पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आल्यावर जनरल डब्यात उभे राहण्यास जागा नसते. मग नाईलाजाने स्लीपर कोचमध्ये जातात. प्रवास सुरु असताना टीटीई येतो, फाईन आणि तिकीटाचे डिफरन्स घेतो. मग जनरल तिकीटावर स्लीपर क्लासमधून प्रवास करता येत नाही का? त्यासंदर्भात काय आहे नियम…
असा आहे नियम:
जनरल तिकीटावर रेल्वेतून काही अटींच्या आधीन राहून स्लीपर कोचमध्ये प्रवेश करता येतो. यासंदर्भात रेल्वे नियम 1989 आहे. यानियमानुसार जर तुमचा प्रवास १९९ किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर जनरल तिकीटाची व्हॅलिडीटी ३ तास असते. तुमच्याकडे जनरल तिकीट आहे अन् रेल्वेच्या जनरल कोचमध्ये पाय ठेवण्यास जागा नाही, तेव्हा तुम्हाला पुढची ट्रेन येण्याची वाट पाहावी लागेल. कारण हे तिकीट कोणत्याही रेल्वेतून प्रवास करण्यासाठी असतो. विशिष्ट रेल्वेतून प्रवास करण्यासाठी जनरल तिकीट नसते. यामुळे दुसऱ्या रेल्वेतून जनरल तिकीटावर जाता येते.
मग हा आहे :
पर्यायजनरल तिकीटची व्हॅलिडीटी तीन तास आहे. त्या वेळेपर्यंत दुसऱ्या रेल्वेचा पर्याय नाही. तेव्हा तुम्हाला स्लीपर क्लासमध्ये प्रवास करता येतो. त्यानंतर रेल्वे अधिनियम 138 नुसार तुम्हाला स्लीपर कोचमध्ये गेल्यावर प्रथम टीटीईची भेट घेतली पाहिजे. त्याला परिस्थितीची पूर्ण जाणीव करुन दिली पाहिजे. जर एखादी सीट रिकामी असेल तर टीटीई तुम्हाला जनरल आणि स्लीपर क्लास यामधील फरकाची रक्कम घेऊन त्याची पावती देईल. त्या सीटवर तुम्हाला प्रवास करता येईल. परंतु एकही सीट रिकामी नसेल तर तुम्हाला पुढील स्टेशनपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देईल.तुम्हाला जर स्लीपर क्लासमधून जायचे नसेल तर 250 रुपये दंड भरून स्लीपर क्लासमधून प्रवास करता येणार आहे. जर तुमच्याकडे 250 रुपये नसतील तर टीटीई चनल बनवले. ते तुम्हाला न्यायालयात जमा करावे लागेल. रेल्वे प्रवास करताना या सर्व नियामांची माहिती प्रवाशांना गरजेची आहे.