राजकारणाशिवाय युवकांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध :- डॉ. महेंद्र कदम

| सोलापूर / महेश देशमुख | राजकारण हे एक क्षेत्र आहे. राजकारणाशिवाय युवकांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. त्या क्षेत्रातही युवकांनी आपले कर्तृत्व गाजवावे, छत्रपती संभाजी महाराजांना सहा ते सात भाषा अवगत होत्या असे मत राज्य रंगभूमी परिक्षण मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी माढा तालुक्यातील टेंभुर्णीत आयोजित छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी मरण पत्करले पण स्वराज्यातील गड, किल्ल्यांच्या चाव्या दिल्या नाहीत व मराठ्याचे युद्धतंत्र औरंगजेबाला सांगितले नाही.

शंभु शासन प्रतिष्ठानकडून सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात ३४१ वा छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शनिवार, दिनांक १६ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व युवकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य रंगभूमी परिक्षण मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने व टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे ए.पी.आय सुशील भोसले उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपराव भोसले होते.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने यांनी उपस्थित सर्वांना छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शंभूशासन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रज्वल दिपकराव पाटील यांनी प्रास्ताविक केले व शंभूशासन प्रतिष्ठानच्या कार्याचा उलगडा केला. त्यानंतर प्रमोद ननवरे यांनी प्रतिष्ठानचे ध्येय उद्दिष्ट आणि सदस्यांनी काय कार्य केले पाहिजे याची सविस्तर माहिती सांगितली तद्नंतर राज्याभिषेक सोहळा सर्व सदस्यांनी एकत्र येऊन मंगलमय वातावरणात संपन्न केला.

शंभूशासन प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अविनाश भोसले यांनी प्रतिष्ठानची भविष्यातील वाटचाल कशी राहील व आतापर्यंतचे कार्य हे आपल्या भाषणात सांगितले.

अध्यक्षीय भाषणामध्ये दिलीपराव भोसले म्हणाले की, युवकांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी असेच कार्य चालू ठेवत गोरगरीब घटकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे.

यावेळी मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी बंडूनाना ढवळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप ,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, माढा तालुक्याचे युवा नेते विनोद पाटील,अटकेपार झेंडा ग्रुप चे अध्यक्ष दयानंद महाडिक,चॉईस बोअरवेल्स आणि डेव्हलपर्सचे शांतीलाल बागवाले,युवा उद्योजक दिपक पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक प्रदिप पाटील, संतोष पाटील, योगेश भोसले,रोटरी क्लबचे अध्यक्ष शब्बीर जागीरदार, माजी अध्यक्ष मुकुंद अटकळे, सचिव बंडू रावळ, बेंबळे गावचे युवा नेते यशवंत भोसले, नारायण भानवसे, अकोले गावचे युवा नेते स्वप्नील पाटील, दत्ता पाटील, ग्रामपंचायत सदस्य डॉ. भीमराव पवार, नितीन भोसले, यश बागवाले, वैभव भोसले, वैभव डरंगे , सचिन पराडे, महेश गवळी, अमोल सरडे, ओंकार रावळ, खुशाल फुगे, रोहित थोरात, रणजीत जगताप, दिग्विजय पाटील, सौरभ बागल, कुलदीप पाटील, विशाल गलांडे , वैभव लोंढे, अमोल शिंदे व सर्व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष हनुमंत तावरे यांनी केले.

३४१ व्या छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे दिमाखदार आयोजन केल्याबद्दल मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडे, माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, जिल्हा संघटक प्रदिप पाटील यांनी शंभुशासन प्रतिष्ठानच्या सर्व युवकांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *