राज्यात ८५०० आरोग्य विभागातील पदांची मेगा भरती, जाणून घ्या इत्यंभूत माहिती

| मुंबई | राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील.

या पदभरतीचा तपशील आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. रखडलेली ही जाहिरात प्रसिद्ध करुन राज्य सरकारने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा दिला असल्याचं सांगण्यात येतंय.

गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरोग्य विभागाच्या या रखडलेल्या जाहिरातीचा एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर महाआघाडीचं सरकार आल्यानंतरची ही पहिलीच सर्वात मोठी जाहिरात आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रतिक्षेत असलेल्या अनेकांना दिलासा मिळाल्याचं दिसतं.

फेब्रुवारी 2019 मध्ये मागवले अर्ज
या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसल्याचं सांगण्यात येतंय. फेब्रुवारी 2019 साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील.

राज्याच्या ग्रामविकास खात्याकडे आरोग्य विभागाची जी जवळपास दहा हजार पदे आहेत ती आणि आरोग्य खात्याची स्वत: ची सात हजार पदे अशी एकूण सतरा हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी आता 50 टक्के पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा
सदर प्रसिध्द झालेल्या जाहिरातीसाठी पुढच्या महिन्यात, फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येतील असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एसईबीसी उमेदवार हे आर्थिक दुर्बल प्रवर्गाचा लाभ घेऊ शकतात असे सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

आरोग्य विभागाची भरतीची जाहिरात
स्वतंत्रपणे विभागाच्या सामान्य प्रशासन विभागाने आरोग्य सेवेतील ५० टक्के रिक्त पदांवरील पद भरती प्रक्रियेस मान्यता दिली असल्याने www.mahapariksha.gov.in व www.arogya.| maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर नियुक्ती प्राधिकारीनिहाय रिक्त पदांचा तपशील प्रसिद्धसदर प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासन स्तरावर राखून ठेवण्यात पदभरतीबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पद भरतीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती; परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल रह झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान, कोविड-१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे. पद भरती तपशील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा तातडीने घेणे आवश्यक असल्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात प्रक्रियेद्वारे जे अर्ज मागविण्यात आले होते त्या अर्जानुसार पात्र असलेले उमेदवार या पद भरतीची परीक्षा देण्यास पात्र ठरतील.

सदर परीक्षा संपूर्ण राज्यात दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ ला एकाच दिवशी घेण्यात येईल. याबाबतचा तपशील वेळोवेळी वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल.

मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र. १५७३७/१९ आणि इतर याचिकांवरील दिनांक ०९.०९.२०२० च्या सुनावणीत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली आहे.

याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्र. राआधो-४०१९/न.क्र. ३१/१६-अ दिनांक २३.१२.२०२० नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील घटकांना अनुज्ञेयतेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) प्रवर्गाचा लाभ देण्यास मान्यता दिलेली आहे. या अनुषंगाने असे नमूद करण्यात येते की,
i) आरोग्य सेवा आयुक्तालयातील पद भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून (एसईबीसी) आवेदनपत्र भरलेले आहे अशा उमेदवारांनी त्यांना अनुज्ञेय असल्यास आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी, परीक्षेच्या दिवसांपर्यंत आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र अनुज्ञेय
असल्याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावे.

ii) ज्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ मिळू शकणार नाही अथवा ज्या उमेदवारांनी यासाठीची पसंती कळविलेली नसल्यास त्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येईल व त्यांना जाहिरातीमधील खुल्या प्रवर्गातील अटी
लागू राहतील.

iii) ज्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आवेदन भरताना रु. ३००/- इतके
परीक्षा शुल्क भरलेले आहे. त्यापैकी,

अ) ज्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा (ईडब्ल्यूएस) लाभ मिळण्याबाबत
प्रमाणपत्र मिळू शकणार नाही त्या उमेदवारांना आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या भारतीय स्टेट बँक, शाखा-
पुणे, मुख्य जिल्हाधिकारी कार्यालय कम्पाऊंड, डॉ. आंबेडकर रोड, पुणे-४११ ००१ बँक खाते क्रमांक
११०९९४५४३१३, आयएफएससी कोड क्र. SBIN0000454 या बँक खात्यात रु. २००/- इतके
अतिरिक्त परीक्षा शुल्क परीक्षेच्या दिवसापूर्वी भरणे आवश्यक आहे.
ब)आणि ज्या उमेदवारांना आर्थिक मागास प्रमाणपत्र (ईडब्ल्यूएस) अनुज्ञेय आहे अशा उमेदवारांनी
परीक्षेच्या दिवसापूर्वी असे प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.
क) वरील २(ii) प्रमाणे जर ज्या उमेदवारांनी अतिरिक्त परीक्षा शुल्क भरले आहे, त्याची पावती आणि २(i)
प्रमाणे ज्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र घेतले आहे,
त्यांनी ते प्रमाणपत्र समुपदेशनाच्या वेळी निवड समितीला उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. तसेच सदर
संकेतस्थळावर देण्यात येतील.
करण्यात आलेला आहे, त्यामध्ये अनुशेषामध्ये बदल झालेला आहे. त्यानुसार पद भरती करण्यात येईल. तरी सर्व उमेदवारांनी पदांच्या तपशिलासाठी वेळोवेळी उक्त संकेतस्थळावर भेट द्यावी.
येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *