‘बोले तैसा चाले ‘ हे आपल्या कृतीतून दाखवत, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ कौतुकास्पद काम..

| महाड | देव तारी त्याला कोण मारी! महाड तालुक्यातील तारिक गार्डन इमारत संपूर्णपणे ढासळल्याने झालेल्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली होती, परंतु चार वर्षीय मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग ही दोन लहान मुले सुदैवाने बचावली. परंतु ही दोन्ही मुले या दुर्घटनेत त्यांच्या आई – वडिलांचे छत्र गमावल्याने निराधार झाली. या दोन मुलांचे पालकत्व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन ने स्विकारले असून महाड येथे जाऊन त्यांनी या दोन्ही मुलांची भेट घेतली. प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश त्यांच्या हाती सुपुर्द केले असून त्यांच्या नावे बँक खाती उघडून फिक्स्ड डिपॉझिटमध्ये सदर रक्कम ठेवण्यात येणार आहे. तसेच या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन उचलणार आहे.

ही महाड घटना अतिशय दुर्दैवी होती. या दुर्घटनेत अनेकांचे प्राण गेले तर ही दोन लहान चिमुकली आई-वडिलांना पोरकी झाली. या मुलांना मदतीचा हात देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने केला आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी आमदार भरतशेठ गोगावले, शहर प्रमुख नितीन पावले, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, महाड पंचायत सभापती सपना मालुसरे, पोलिस उप-अधिक्षक सचिन गुंजाळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक सुभाष साळुंखे, आणि महाड येथील स्थानिक शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *