संभाजी ब्रिगेड आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणार..

| सोलापूर (प्रतिनिधी) | संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा- पंढरपूर विभागाची जिल्हा कार्यकारणी बैठक शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे संपन्न झाली.यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी लढवेल व परिवर्तन घडवेल असा निश्चय सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.

ही बैठक संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत रणजीत भाकरे-चव्हाण यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली. बैठकीत आगामी सर्व निवडणुका लढविण्यासंदर्भात चर्चा होऊन एकमताने निवडणूका लढविण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचा नवा पर्याय मतदारांसमोर असणार आहे.

यावेळी सचिव सुहास टोणपे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, अमोल शेळके,अनिल यादव, जिल्हा संघटक प्रमोद जगदाळे, गणेशजी सव्वासे
पंढरपूरचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल, करमाळ्याचे तालुकाध्यक्ष अमित घोगरे, माढ्याचे तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, सांगोल्याचे प्रताप इंगोले, मंगळवेढ्याचे समाधान क्षिरसागर पंढरपूर शहराध्यक्ष स्वागत कदम, दिनेश जगदाळे, करमाळा तालुकाध्यक्ष अतुल वारे, राजेश ननवरे, गणेश डोके, राजेश बाधले महाराज,मुन्ना भोसले, स्वप्निल गायकवाड, सचिन पराडे – पाटील, दिगंबर मिसाळ-पाटील, अमोल कुंभार, दादा बोडके, पप्पू देशमुख, शेखर आटकळे आकाश मांडवे, फिरोज कोरबु, महादेव पवार, आकाश पवार, सिताराम नलवडे, महेश जाधव, रणजित देशमुख, अविनाश पाटील, अजय गायकवाड,शंकर नागणे, रामभाऊ पराडे,महेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *