अंतराळात उपग्रह प्रेक्षपणात जि.प. शाळा माणच्या विद्यार्थ्यांचा सहभाग !७ फेब्रुवारीला उपग्रह अवकाशात..!

| पुणे | डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फांऊडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी खगोलीय ज्ञान व तंत्रज्ञानाच्या स्वप्नपूर्ती विद्यार्थांनी बनविलेले १०० उपग्रह रविवारी ७ फेब्रुवारी रोजी एकाच वेळी प्रेक्षिपित करण्यात आले. हे उपग्रह बनविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण ता. मुळशी जि. पुणे येथिल आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन , द मार्टिन ग्रुप आणि स्पेस झोन इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्पेस रिसर्च पेलोड क्यूबज चॅलेंज २०२१ चे आयोजन केले होते. ७ फेब्रुवारीला रामेश्वरम येथून हेलिअम बलून मार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

७ फेब्रुवारी रोजी रामेश्वरम टीव्ही टॉवर येथे झालेल्या प्रेक्षपण कार्यक्रमासाठी तेलंगाणाच्या राज्यपाल डॉ. तमिलसाई सौंदरराजन , डीआरडीओ चे माजी महानियंत्रक पद्मभूषण डॉ.ए .एस. पिल्लई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेक्षपण कार्यक्रम संपन्न झाला.

जगात सर्वांत कमी वजनाचे (२५ग्रँम ते ८० ग्रँम ) १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५००ते ३८००० मीटर उंचीवर अल्टीट्यूड सायंटिफिक बलूनद्वारे प्रस्थापित केले . उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले आहेत. या केससोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम ,लाइव्ह कॅमेरा लावलेला आहे. तेथून प्रत्यक्ष ओझोन , कार्बन डायऑक्साईड , हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीतील केंद्राला पाठवतील व पेलोड सोबत काही झाडांचे बीज सुध्दा पाठवण्यात येत आहे यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल.

भारतात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविला गेला. १०० उपग्रहांपैकी ३८ उपग्रह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटांनी बनविले . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण येथिल गणेश बाबू निम्मणवाड , गायत्री अंकुश कुंभार , चैतन्य सतिश शिंदे , मारुती वानखेडे , राखी राजेंद्र राकांवत , योगिता शिवाजी फड , प्रज्ञा सखाहरी हाळीकर , सिद्धेश नानासाहेब शिंदे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता .

हे उपग्रह बनविण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण झाले आहेत . प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याचे एकदिवसीय प्रशिक्षण १९ जानेवारी २०२१ रोजी जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ हडपसर येथे झाले. उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याच्या संधीबरोबरच उपग्रह बनविण्याची संधी, पूरक अभ्यासक्रमाचा लाभ मिळाला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यास मदत होणार आहे.

माण शाळेच्या विद्यार्थ्यांना द मार्टीन ग्रुप मुंबईने प्रायोजित केले गेले . मुख्याध्यापक आत्माराम वाघमारे , वर्गशिक्षक रामदास वाव्हळ , सुनिता बोडके , प्रिती पंडीत यांनी परिश्रम घेतले.

मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती पांडूरंग ओझरकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडीत गवारे, उपाध्यक्ष पांडुरंग महाडीक , गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर , केंद्रप्रमुख सुरेश साबळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

” उपग्रह निर्मिती कार्यशाळा मुळे आम्हां विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञान माहिती मिळाली व अंतराळ कार्यक्रमाची आवड झाली.”
– गणेश निम्मणवाड , विद्यार्थी.

” कोरोना लॉकडाऊन कालावधी मध्ये ऑनलाईन शिक्षणासोबत सहशालेय उपक्रम म्हणून उपग्रह निर्मिती कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग हा इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. उपग्रह , अंतराळ कार्यक्रमाची आवड निर्माण झाली. “
आत्माराम वाघमारे
मुख्याध्यापक जि.प. प्रा. शाळा माण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *