
| नाशिक | शिक्षिकेने महापालिकेच्या सर्वेक्षणादरम्यान कुटुंब सदस्याला जात विचारल्याचा राग आल्याने परिसरातील नागरिकांनी त्या महिला शिक्षकेला हाकलून लावल्याची घटना घडली. सिडको परिसरात सध्या हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाने नाशिक महापालिका शिक्षण विभागातर्फे शहरांतर्गत शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम सुरू आहे. यासाठी महापालिका व खासगी शाळेतील शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. गुरुवारी (ता.४) सिडकोतील रायगड चौकात हिरे शाळेच्या शिक्षिका टीमसमवेत परिसरात सर्वेक्षण करत असताना एका कुटुंबातील सदस्याला माहिती विचारात असताना त्यांनी नमुण्याप्रमाने अनुक्रमे जात विचारली.
परंतु, संबंधित कुटुंबातील सदस्याला जात विचारल्याने राग आला. आपण जात का विचारत आहात, असा सवाल करत त्या शिक्षिकेसह टीमला तिथून पळवून लावले. या वेळी काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत शिक्षण विभागाकडून अजून अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही..
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..