शिक्षकाचा मुलगा म्हणुन घेणेच मला जास्त आवडेल – मृदु व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

| अहमदनगर | गुरुकुल शिक्षक मंडळ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तर्फे शिक्षकांच्या मेळाव्यात बोलताना मृदु व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हटले की माझे वडील सर्वात प्रथम शिक्षक होते. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार झाले व मी सध्या मंत्री आहे. परंतु या सर्व पदांपेक्षा मला मी शिक्षकाचा मुलगा आहे हे म्हणवुन घेणे मला जास्त आवडते. नगर जिल्हा पुरोगामी विचारांचा असून यामध्ये शिक्षकांचे कामकाज मोठे आहे. शिक्षकांचे असलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

गुरुकुल शिक्षक मंडळ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शिक्षकांचा मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे होते. या वेळी मंत्री शंकरराव गडाख यांचा सत्कार करण्यात आला आहे.

या प्रसंगी रा. या. औटी, शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, संजय धामणे, भास्कर नरसाळे, सूदर्शन शिंदे, सीताराम सावंत, अंबादास झावरे, वृषाली कडलग आदी उपस्थित होते.

कळमकर म्हणाले की, शेतकर्यांना बंद झालेली पेन्शन योजना पूर्ववत सुरु करणे गरजेचे आहे. शिक्षक हा उद्योजकाचा मुलगा नसून शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे ही पेन्शन शेतकर्यांसह सर्वांना लागू होणार आहे. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतल्यास शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल. याप्रसंगी रा. या.औटी, संजय धामणे आदींची मान्यवरांची भाषणे झाली. प्रास्ताविक नितीन काकडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *