शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे, वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव व रुपाली विकास रेपाळे यांच्या वतीने प्रभाग क्र १९ मधील महिलांसाठी महाभोंडल्याचे आयोजन..!

| दैनिक लोकशक्ती ऑनलाइन/ ठाणे | शारदीय नवरात्रीनिमित्त प्रभाग क्र. १९ मधील महिलांकरिता ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे मराठमोळा महाभोंडला या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती – सदस्या नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता .

सदर कार्यक्रमामध्ये महापौर नरेशजी म्हस्के यांनी प्रमुख उपस्थिती लावून सर्व महिलांना नवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच नगरसेवक विकास रेपाळे यांच्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला उपमहापौर सौ. पल्लवी कदम, माजी महापौर स्मिता इंदुलकर, नगरसेविका सौ. नंदीनी विचारे, जयश्री फाटक, निर्मला कणसे, प्रभा बोरीटकर, संध्या मोरे, महिला आघाडीच्या वंदना डोंगरे, व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली

या महाभोंडला स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या यामध्ये आयोजित लकी ड्रॉ मध्ये सुर्वेवाडी येथे राहणाऱ्या प्रतिक्षा खोपकर यांनी मानाची कलामंदिरची पैठणी साडी व प्रणाली घरट यांनी राजवंत ज्वेलर्सची सोन्याची नथ पटकावली तसेच वेशभूषा स्पर्धा, खिरापत स्पर्धा अशा विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

प्रभागातील सर्व महिलांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबाबत नगरसेवक विकास रेपाळे,वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव व रुपाली विकास रेपाळे यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *