शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तरुणांसाठी प्रबोधनात्मक ऑनलाईन शिबीर संपन्न..!

| सोलापूर | हिंदूहृद्यसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष सोलापूर शहर व खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विद्यमाने समाज प्रबोधनात्मक ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शासकिय रुग्णालयाचे मानसोपचा तज्ञ डॉ.कुंदन कांबळे यांनी तरुणांची खचत चाललेली मानसिकता या महत्वाच्या विषयावर विषेश प्रबोधन केले. या मध्ये त्यांनी राज्यातील वाढ़त्या युवक वर्गाच्या आत्महत्येबद्दल बोलताना खासगी सावकारकी, वाढती बेरोजगारी, व्यसनाधीनता या मुख्य कारणांमुळे आत्महत्या वाढ़त असल्याचे सांगत यावर वेळेतच हे सर्व प्रकार रोखण्यासाठी कड़क नियमावली बनविणे आवश्यक असल्याच मत व्यक्त केल.

या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तमजी बरडे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगश चिवटे व सोलापूर समन्वयक रविकांत गायकवाड यांची होती. या कार्यक्रमाचा उद्देश तरुणांची खचत चाललेली मानसिकता सुधारणा हाच असल्याच मत रविकांत गायकवाड यांनी व्यक्त केल.यावेळी डॉ.कुंदन कांबळे यांचा वैद्यकिय मदत कक्ष सोलापूर चे समन्वय रविकांत गायकवाड़ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *