| शिवभक्त खासदार | शिवजयंतीला रायगडवर नेत्रदीपक रोषणाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने रायगडला रोज पुष्पहार अर्पण..

| मुंबई | छत्रपती शिवरायांच्या 391 व्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात येणार आहे. राज सदरसह रायगडवरील विविध वास्तू उजळणार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली होती. यावेळी किल्ल्यावरील महत्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने त्यांनी पुरातत्व विभागाचे राजेंद्र यादव यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. रायगडवर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली. त्यावेळी विद्युत रोषनाई करण्यासाठी आवश्यक फंड नसल्याचे यादव यांनी सांगितले. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जो ही फंड लागेल मी देतो, मात्र रायगड अंधारात ठेवू नका अशा सूचना केल्या.

त्यानुसार मागणीचे पत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाला दिले. या मागणीवर पुरातत्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार शिवजयंतीला किल्ले रायगडावरील वास्तू नेत्रदीपक रोषणाईने उजळणार आहे. यापुढे किल्ले रायगड अंधारात राहणार नाही, असे अभिवचन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुरातत्त्व विभागाने दिले.

रायगडवर रोज पुष्पहार अर्पण :

छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर व होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा आणि समाधी स्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. संकल्प उद्या शिवजयंतीच्या माध्यमातून सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *