खरंतर मला आणि माझ्या वडिलांनाही वाटायचं की मी तांत्रिक शिक्षण घेऊन अभियंता वगैरे व्हावं पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मला नाईलाजास्तव डी.एड. करावं लागलं. त्यामुळे अभ्यासात थोडे दुर्लक्ष झाले त्याचे परिणाम मला पुढील पाच वर्षे भोगावे लागले. २००४ मधे कशीबशी बीड जि.प. त नोकरी लागली. आता ठरवलं होतं की जे काम नशिबी आलं ते इमानेइतबारे उत्तम करायचं. सुर्डी या गावात रूजू झालो. वर्ग चार त्याही जीर्ण झालेल्या वर्ग खोल्या दोन शिक्षक तीन. मी नवीन असल्याने मला मागची खोली मिळाली जी कापसाच्या पयाट्या व उकीरड्यांनी वेढलेली होती. चित्र खूपच नकारात्मक होतं . वर्षभरानंतर शाळेचा चार्ज माझ्याकडे आला आणि खर्या अर्थाने माझ्या मनाप्रमाणे मी काम करू लागलो. गावातील तरुणांना सोबत घेत लोकसहभाग गोळा केला शाळेच्या भिंती दुरूस्त करून स्वतः रंगरंगोटी केली. फरशी बदलून घेतली. आता शाळा शाळे सारखी भासू लागली.
मग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे वळालो. भाषा समृद्धी साठी विविध भाषिक खेळ सुरू केले, वाचन दोरी उपक्रम सुरू केला. सानेगुरूजी कथामाला अंतर्गत संपूर्ण शामची आई पुस्तकाचे परिपाठात रोज एक प्रकरण वाचन सुरू केलं. त्यानंतर गणिताकडे वळालो. कृतियुक्त गणित संबोध तसेच गोष्टी रूपाने गणित , चालीतील पाढे पाठाःतर असे ऊपक्रम राबवले. २००८ मधे मी गावातील तरूणांना हाताशी धरत निर्मल ग्राम पुरस्कारासाठी तेथिल सरपंच व नागरिक यांनी सहभाग नोंदवला व त्यावर्षी निर्मल ग्राम पुरस्कार ही पटकवला.
सन २०१० मधे नाशिक जि.प. मधे चांदवड तालुक्यातील नारायण खेडे या गावात बदली झाली. त्यावेळेस शाळेची पटसंख्या होती अवघी १८ हळूहळू छोटे छोटे उपक्रम राबवण्यास सुरूवात केली. मुलांनाही आता गोडी निर्माण व्हायला लागली. २०१0 ते २०१५ पर्यंत ववेगवेगळे उपक्रम राबवले आता शाळेची पटसंख्याही वाढू लागली 2015 मधे नवी दिल्ली येथे ccrt चे प्रशिक्षण करून आलो पीएसएम ही नुकताच सुरू झाला होता AIL व पीएसएम च्या ज्ञानरचनावादी पध्दतीने मुलांची गुणवत्ता वाढीस लागली. त्यात तालुक्यात let’s speak नावाचा उपक्रम तत्कालीन गटशिक्षणाधिकारी बी.टी.चव्हाण साहेबांनी सुरू केला. त्याचा वापर माझ्या मुलांसोबत तालुक्यातील मुलांनाही करून देता आला.
गाव तसं आर्थिक बाबतीत साक्षम नव्हतं तरी मुलांची गुणवत्ता पाहून आम्हाला पुरेसा लोकसहभाग मिळून शाळेची रंगरंगोटी करता आली भिंती बोलक्या झाल्या, प्रोजेक्टर , कम्प्युटर मिळाला. आता मुलं डीजीटली शिकू लागले. अशातच २०१८ मधे धोंडगव्हाण येथे बदली झाली. तेथे वर्षभर काम करता आले. इयत्ता सहावीचा सेमी इंग्रजी चा वर्ग वाट्याला आला. तेथे ही वर्गासाठी अनेक उपक्रम राबवता आले. वक्तृत्व स्पर्धेत तालुकास्तरावर माझी विद्यार्थ्यांनी बाजी मारत जिल्हा स्तला गाठला.२०१९ मधे निफाड तालुक्यातील बोकडदरे गावात बदली झाली आणि खर्या अर्थाने मी व माझी मुलं आंतरराष्ट्रीय झालो.
✓ शाळा स्तर उपक्रम :
१. सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन
२. कमवा शिका
उपक्रमांतर्गत राखी निर्मिती कार्यशाळा कला शिक्षकांच्या सहकार्याने घेतली त्या राख्यांची विक्री करून आलेल्या पैशांतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी केले.
३.विद्यार्थी सभा व विद्यार्थी परिषद निवडणूक :
प्रत्यक्ष निवडणूकीतून विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजावून दिली. ईव्हीऐम अॕपच्या साहाय्याने निवड झालेल्या प्रतिनिधी ना माःतहसिलदार साहेबांच्या हस्ते शपथ देण्यात आली.
४. आकाशकंदिल निर्मिती कार्यशाळा या अंतर्गत मुलांनी साधारण ३०० आकाशकंदिल तयार केले.
५. सूर्यग्रहणाविषयी शास्त्रीय माहिती व प्रत्यक्ष चष्म्यांचा वापर करून सूर्यग्रहण दाखवले.
६. इंग्रजी मॕगेझीन निर्मिती . विद्यार्थ्यांना कृतीतून इंग्रजी शिकता यावे म्हाणून प्रत्येकाला वेगवेगळे विषय वाटून देत त्यांना त्याविषयांवर इंग्रजी तून लेख, पोस्टर , कविता ,गोष्टी इत्यादी लिहीण्यास प्रवृत्त करण्यात आले.
✓ इंग्रजी समृद्धी साठी आणखी उपक्रम घेण्यात आले..
१. Spell champ याअंतर्गत रोज विद्यार्थ्यांना स्पेलींग पाठांतर द्यायचे जो विद्यार्थी दिलेले सर्व स्पेलींग पाठाःतर करेल त्याला स्पेल चाम्पचा बॕज दिवसभर लावायचा.
2. mind map विद्यार्थ्यांच्या creative आणि शोधक वृत्तीला चालना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला यामुळे त्यांचे शब्द सामर्थ्य वाढले.
3. sentence marathon हा एक सुंदर उपक्रम यात दिलेल्या वेळेत जो जास्तीत जास्त बरोबर वाक्य तयार करेल तो विजेता असा हा खेळ विद्यार्थ्यांचे खेळातून वाक्यनिर्मिती कौशल्य वाढवून गेला.
4. story telling विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता यावे त्यांच्या जीभेला इंग्रजी शब्दांचे वळन लागावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबवला दर शनिववारी एकाने इंग्रजी स्टोरी सांगायची.
5. नाट्यीकरण इंग्रजी विषयातील संवाद फेक व प्रसंगानुसार वापरले जाणारे विविध शब्दसमूहांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला.
✓ माझे स्वतःचे सातत्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण :
१. microsoft चे २०० च्या वर कोर्स पूर्ण
२. flipgrid या educational toolच्या तीनही लेव्हल पूर्ण
३. flipgrid चा student voice ambassador
४. Wakelet चा ambassador व community leader
५. Clever Books या AR VR tool चा ambassador
६. national geographic certified educator
७. अनेक वेबिनार मधे सहभाग
८. AINET all india network of english teachers चा मेंम्बर ५ व्या AINET आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग
९. लाॕकडाऊन काळात मलेशियातील शिक्षक गो काॕक मिंग यांचे minecraft च्या सेशन्सचे तसेच Boomwachers सेशनचे जगभरातील शिक्षकांसाठी आयोजन केले.
१०. Back to School या Tweeter chat साठी भारतातून host होतो.
११. पर्यावरण रक्षणासाठी व संवर्धनासाठी शालेय स्तरावर तसेच महाविद्यालयीन स्तरावर विविध उपक्रम राबवणारी स्विडन स्थीत संस्था Eco Training Center चा भारतातील co ordinator म्हणून निवड.
१२. ESL Games by Jenny White यांच्या पुस्तकात माझा इंग्रजी विषयाचा गेम झापलाय.
१३. चित्रलेखा साप्ताहिकाने दखल घेत माझ्या कामाविषयी लेख लिहिला.
१४. शिक्षण तज्ञ हेरंभ कुलकर्णी सरांनी माझी शिक्षण संवाद उपक्रमांतर्गत मुलाखत घेतली.
१५. z24 तास व Tv9 मराठी बातवाहिन्यांनी माझ्या आंतरराष्ट्रीय कामाची दखल घेतली.
१६. नुकतीच रोमानियाहून प्रसिद्ध होणाऱ्या शैक्षणिक नियतकालीकेच्या को आॕर्डीनेटर टीम मधे माझी निवड झाली.
✓ आंतरराष्ट्रीय स्तर उपक्रम :
१. microsoft innovative educator expert 2020-2021
microsoft innovative educator master trainer २०२०-२१ साठी निवड जवळपास ५०० शिक्षकांना विविध कोर्स बद्दल व्हर्च्युअल प्रशिक्षण दिले.
२. skype in the classroom cultural collaboration अंतर्गत विविध देशांतील मुलं व शिक्षकाःशी सांस्कृतिक भाषिक शैक्षणिक गोष्टींबाबत चर्चा व देवाणघेवाण mystery skype /mystery animals game विविध प्रश्न विचारून परस्परांचे देश तसेच प्राणी ओळखणे असे अनेकविध उपक्रम राबवले . तसेच आत्तापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय नॕशनल पार्कला माझ्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.
३. card exchange ख्रिस्तमस व नव वर्षाचे शुभेच्छा कार्ड आमच्या विद्यार्थ्यांनी तयार करून रशियातील Ivanova प्रांतातील Lycium 33 या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठवले तसेच त्यांचेही कार्ड आम्हाला आले.
४. plastic brigade पोर्तुगालच्या manuala Coria da silva या शिक्षिकेच्या प्रोजेक्टमधे सहभाग नोंदवत reuse plastic हा प्रकल्प शाळास्तरावर राबवला. व रिकाम्या प्लास्टिक बाटल्या चे सुंदर hanging garden बनवले.
५. Effie Bachtsevana या ग्रिसच्या शिक्षिकेच्या Boomwachers या संगीत निर्मिती करणाऱ्या व त्यातून कृतियुक्त इंग्रजी शिकता येणाऱ्या वाद्याची माहिती घेतली.
६. नॕशनल जिओग्राफीक एज्युकेशन च्या प्लॕटफाॕर्मवर विविध रिसोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता आले. त्याचा reuse plastic या विषयावर तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केला.
७. schools around the world या उपक्रमात सतत दोन वर्षांपासून सहभाग नोंदवून विविध जागतिक विषयांवर माझ्या शाळेतील तसेच रशिया आणि डेन्मार्कच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.
८. युनेस्को स्कूल क्लब ची स्थापना करून विद्यार्थ्यांना युनेस्को आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धांमधे विद्यार्थ्यांचा सहभाग.
९. युनोच्या sustainable development goals 2030 च्या अंतर्गत विविध 17 नाॕर्मस् संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती मिळावी व त्यादृष्टीने उपक्रम घेता यावेत म्हणून शाळेला ग्लोबल स्कूल्स प्रोग्राम चे सदस्यत्व मिळवून दिले.
१०. Wakelet या अॕपचा वापर विद्यार्थ्यांना विविध विषयासंदर्भात जास्तीतजास्त माहिती मिळावी यासाठी तसेच त्यांना स्वतःचे प्रकल्प करता यावेत यासाठी करत असतो. हे अॕप विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावरचे text, videos, powerpoint presentation , images,files ,projects एकाच ठीकाणी उपलब्ध करून देते.
११. Flipgrid हे अॕप विद्यार्थ्यांना अनेक लर्निंग रिसोर्सेस उपलब्ध करून देते. तसेच त्यांना अनेक विषयांवर आपले व्हिज्युअल मत व्यक्त करण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध करून देते. आमच्या विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर उपयोग करत अनेक ग्रीडस् वर व विषयांवर आपले मत व्यक्त केलेय. तसेच ग्लोबल रिडींग प्रकल्पात सहभाग नोंदवून विविध स्टोरी रिडींग साधर केल्यात.
१२. AR व VR चा वापर
Augmented Reality व Virtual Reality या अॕपस् चा वापर करून आभासी प्रतिमांतून अनेक विषय सहज व सोप्पा करून सांगता येतो. Clever books , Co spaces Assemblr तसेच space 4D यांचा वापर अध्यापनात केला जातो.
१३. लाॕकडाऊन काळात इतर देशातील शिक्षक व विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरा भौगोलिक स्थिती ऐतिहासिक वारसा इ. ची माहीती व्हा वी यासाठी incredible Maharashtra हा उपक्रम राबवला. साधारण १० देशांतील विद्यार्थ्यांना ही सफर skype in the classroom व microsoft teams च्या माध्यमातून घडवून आणली.
१४. ५ सप्टेबरला२०२० जागतीक शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी मुलांनी कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी विविध देशातील शिक्षक हजर होते.
– प्रदीप देवरे नाशिक
उपशिक्षक जि.प.शाळा बोकडदरे ता. निफाड जि. नाशिक