विशेष लेख : खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना अनावृत्त पत्र

प्रति,
माननीय खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब,
कल्याण लोकसभा

जय महाराष्ट्र साहेब,
पत्रास कारण की, सध्या पत्राला एक वेगळा आयाम मिळू पाहत आहे. पुन्हा नव्याने पत्राचे महत्व भावनेचा ओलावा आधोरेखीत करत आहे. म्हणून म्हंटल चला पत्र लिहूया..! आपला आज वाढदिवस.. त्या निमित्ताने आपल्याशी हा छोटासा संवाद..!

गेली ७ वर्ष आपण खासदार म्हणून समाजसेवेचा वसा घेऊन आमच्यासाठी राबत आहात. आजच्या दिवशी त्याकरिताच आपल्याला धन्यवाद. हे वर्ष तसे सगळ्या जगासाठीच कष्टदायक आणि चिंताग्रस्त गेले. कोरोनाचे निर्माण झालेले भीषण वादळ आता कुठे शांत होताना दिसत आहे.

या भीषण काळात सुरवातीच्या टप्प्यात बहुतांशी ठिकाणी माणसांसोबत माणुसकीचा बळी गेला. अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊन मुळे सगळे जनजीवन अक्षरशः ठप्प झाले. यात कित्येक सामान्य, हातावर पोट असणारे गरीब, दुर्बल घटकांवर तर अक्षरशः आभाळ कोसळले होते. रोजगार थांबला, उदरनिर्वाहासाठी असणारी पुंजी गोठली, मूळ गावी जाण्याचा मार्ग खुंटला. थोडक्यात काय तर आरोग्याच्या आणीबाणी सह जणू काही देशात सामान्यांसाठी आणीबाणी लागू झाली.

फक्त आपलाच जीव वाचला पाहिजे, बाकी पाहू नंतर अश्या अप्पलपोटी खडतर काळात कित्येक तथाकथित प्रतिष्ठीतांनी आपल्या घराचे दार बंद केले असताना आपण मात्र खंबीरपणे उभे होतात, वृंदावनातील गोप गोपिकांसाठी गोवर्धन उचलणाऱ्या कृष्णाप्रमाणे..

या काळात दररोज लाखो लोकांना अन्न वाटप, जीवनावश्यक सहित्यवाटप आपण केले. लाखो घरातील थंड पडलेल्या चुली आपण पुन्हा पेटविण्यासाठी शक्य ते सारे केलेत. जेंव्हा आपल्या घरातील ५ लोकांना अन्न जेवू घालताना सर्वसामान्यांना भ्रांत पडत होती, तेंव्हा दररोज लाखो लोकांच्या पोटाला आणि मनाला उभारी आपण दिलीत. हे सारे मी स्वतः त्या काळात काम करताना अनुभवले आहे.

त्यासोबतच परप्रांतीय नागरिकांना ( कदाचित ते आपले मतदारही नसतील) त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी आपण घेतलेले परिश्रम असतील किंवा परदेशातील अडकलेले विद्यार्थी, नागरिक असतील किंवा दिल्लीत स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी थांबलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी असतील सगळ्यांना जी हवी आणि शक्य ती मदत आपण केलीत. या दरम्यान वाटप केलेल्या हजारो रुग्णवाहिका, घेतलेली आरोग्य शिबिरे असतील, रक्तदान असेल किंवा हॉस्पिटल मधील एखादी अडचण असेल, आपण आपले नेते, कार्यकर्ते, पत्रकार, पोलीस, डॉक्टर, सर्वसामान्य लोक अगदी सगळ्यांसाठीच धावून आलात.

पायाभूत सुविधा सर्वोत्तम व्हावी म्हणून आपण कार्यरत आहतच, एक उत्कृष्ट खासदार म्हणून आपण संसद गाजवत आहातच, सहज लोकांमध्ये सामावून जाणारे नेते आपण आहातच पण हे सगळे उत्कृष्ट असण्यासोबत आपण माणूस म्हणून उत्कृष्ट आहात हे या कठीण काळात उठावदार दिसून आले.

हे वेगळेपण, आपलेपण आपण नेहमी जपत राहाल, सदैव लोकांच्या हृदयात रहाल या शुभेच्छा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *