
| ठाणे | कल्याण-डोंबिवली चे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी झूम मीटिंग द्वारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या पदाधिकार्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचा विस्तार आता संपूर्ण राज्यभर होत होत असल्याबदल डॉ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. 14 जिल्ह्यापर्यंत झालेला हा विस्तार आणि हळू हळू संपूर्ण राज्यभर करण्याच्या प्रयत्न करावा अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी कोव्हीड संकट काळात दिवस रात्र मेहनत घेऊन काम करत असतात अशावेळी सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी असे प्रतिपादन डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी काम करत असताना येणाऱ्या अडीअडचणी सांगितल्या. यावर खासदार साहेबांनी केली यातून कसा मार्ग काढता येईल याचे देखील मार्गदर्शन केले.
या बैठकीस शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य समन्वयक मंगेश नरसिंह चिवटे, यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजाभाऊ भिलारे उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश म्हस्के, नागपूर शहर समन्वयक सचिन डाखोरे, सोलापूर समन्वयक मनीष काळजे, बीड वडवणी येथील ओमराजे जाधव तसेच सर्व राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!