विशेष : एकाच कुटुंबात आहे गेली ५५ वर्ष ग्रामपंचायतीची सत्ता..!

| अहमदनगर | पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावात गीते कुटुंबाने 55 वर्षांपासून आपल्याच घरात ग्रामपंचायतीत सत्ता राखण्यात यश मिळावलाय. विशेष म्हणजे माजी सरपंच अनिल गीते यांच्या कुटुंबात गेल्या 55 वर्षांपासून एक हाती सत्ता आहेय. तर यंदा पत्नीला सरपंच पद मिळाल्याने संपूर्ण गावाने आनंद उत्सव साजरा केलाय. गिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्या 9 पैकी 5 जागा जिंकून महाराष्ट्र मध्ये एकमेव 55 वर्ष ग्रामपंचायत सरपंच होण्याचा बहुमान मिळवलाय.

हिरा अनिल गिते या लोहसरच्या दुसऱ्यांदा सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. विशेष म्हणजे अनिल गीते यांचे आजोबा 25 वर्ष तर वडील 15 वर्ष सरपंच होते. त्यानंतर स्वतः अनिल गीते आणि पत्नी हिरा या 15 वर्षांपासून सरपंच पदावर कार्यरत आहेय. यंदाही गावकऱ्यांनी आमच्या कुटुंबावर टाकलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

लोहसर गाव आदर्श गाव म्हणून परिचित आहे. आतापर्यंत या गावाला संत तुकाराम, वनग्राम, गाडगेबाबा स्वच्छता अभियान, आदर्शगाव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. तसेच भविष्यात चालू असलेलं काम अतिशय गतीने सर्वांना बरोबर घेऊन करणार असल्याचं मत सरपंच हिरा गिते यांनी व्यक्त केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *