खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा पुरस्कार, नरवीर तानाजी यांच्या नावे दिल्या जाणारे पुरस्काराने गौरव..!

| रायगड | २०२१ चा नरवीर तान्हाजी पुरस्कार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ३५१ व्या नरवीर तानाजी मालुसरे शौर्यदिन, पुण्यतिथी सोहळा दिनी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उमरठच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. उमरठ येथे शनिवारी व रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, रायगड, पंचायत समिती, पोलादपूर व नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उमरठ यांच्या संयुक्त विद्यमाने उमरठ येथे ३५१ वा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे शौर्यदिन, पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन तिथीनुसार करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी सुभेदार नरवीर तानाजी यांच्या पुतळ्याचे पूजन सखाराम कलंबे यांच्याहस्ते करण्यात आले. उद्या रविवारी पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे व शेलारमामा याच्या समाधीला महाअभिषेक विधिवत पूजा, पुष्पचक्र अर्पण आदी कार्यक्रमांसह पालखी मिरवणूक, शीतल मालुसरे लिखित पुस्तकाचे अनावरण खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. भरत गोगावले, राजिप अध्यक्ष योगिता पारधी, डॉ. अमर अडके, इतिहास संशोधक व जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, पदाधिकारी तहसीलदार दीप्ती देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *