राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार तात्यासाहेब पाटील यांना जाहीर..!

| महेश देशमुख / सोलापूर | महाराष्ट्र राज्य शासनाचा २०१९-२०यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोलापूर जिल्ह्य़ातील माढा तालुक्यातील सापटणे टें गावचे सुपुत्र व पालवण ता. माढा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तात्यासाहेब रामदास पाटील यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सदर पुरस्कारांची घोषणा केली आहे. यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात सदर पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. शासन व नागरिक यातील दुवा म्हणून काम करताना शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी पाटील यांचा नेहमी प्रयत्न असतो. पाटील यांनी १९९४ साली रिधोरे गावचे ग्रामसेवक म्हणून सेवेची सुरुवात केली. त्यांनी रिधोरे, पापनस, निमगाव टें येथे काम केले असून सध्या ते पालवण ता. माढा येथे कार्यरत आहेत. त्यांची एकूण सेवा २७ वर्षे झाली आहे.

माढा तालुक्यातील पहिला सिमेंट क्रॉक्रिट रस्ता रिधोरे ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असताना त्यांनी बनवून घेतला. शासनाच्या सर्व योजना नियोजनानुसार व वेळेत पूर्ण करणे हे पाटील यांच्या कामाचे बीद्र वाक्य आहे. त्यांना नोकरीच्या चौथ्या वर्षीच सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला असून अतिउत्कृष्ट कामाबद्दल तीन विशेष वेतनवाढी मिळाल्या आहेत. त्यांच्या कारकीर्दीत निमगाव टें ता. माढा ग्रामपंचायतीला जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकनप्राप्त ग्रामपंचायत बहुमान मिळाला. त्यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत रिधोरे, पापनस, निमगाव टें, पालवण ही गावे हागणदारीमुक्त केली. निर्मलग्राम १०० टक्के ओडीएफ केली. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त अभियानांतर्गत रिधोरे, पापनस, निमगाव टें ही गावे तंटामुक्त केली. पर्यावरण संतुलीत समृद्धी ग्राम योजना, राष्ट्रमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, लोकराज्य ग्राम, अस्पृश्यता निवारण, शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती स्वच्छता अभियान यामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी काम करत ते कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतींना पूरस्कार मिळाले आहेत.२०१९ साली त्यांनी पालवण ही ग्रामपंचायत तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत केली.

पाटील यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत) चंचला पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) परमेश्वर राऊत, जि. प.सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील,प्रशासन अधिकारी सयाजी बागल, माजी उपसभापती तुकाराम ऊर्फ बंडूनाना ढवळे, जि.प.सदस्य प्रतिनिधी आप्पासाहेब उबाळे, जि.प.सदस्य प्रतिनिधी आप्पासाहेब उबाळे, केमचे माजी सरपंच अजित तळेकर यांनी अभिनंदन केले. 

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, उपाध्यक्ष अरूण जगताप, कुर्डूवाडी शहराध्यक्ष सचिन महिंगडे, पालवणचे माजी सरपंच परमेश्वर पाटील, अतुल क्षिरसागर, किरण क्षिरसागर व ग्रामस्थांनी पाटील यांचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *