राज्यातील राळेगण सिद्धी, पाटोदा व हिवरे बाजार या आदर्श गावात ‘ हा ‘ लागला निकाल..!

| पुणे | महाराष्ट्रातल्या १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झालं. आज म्हणजेच १८ जानेवारीला या निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे.

यात अहमदनगर जिल्ह्यातील ‘आदर्श गाव’ म्हणून नावाजलेल्या हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी, तसंच औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा इथल्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कारण गेल्या ३० वर्षांपासून बिनविरोध सरपंचाची निवड होणाऱ्या हिवरेबाजार या गावामध्ये यंदा मात्र निवडणूक झाली. तर राळेगण सिद्धी आणि पाटोदा इथं ही बिनविरोध निवडणुकीला विरोध झाल्यानं निवडणूक पार पडली.

पाटोदा :

पाटोदा इथला निकाल हाती आली असून आदर्श सरपंच भास्कर पेरे यांची मुलगी अनुराधा पेरे यांचा पराभव झाला आहे. त्यांना १८७, तर विरोधी उमेदवाराला २०४ मतं मिलाली आहेत. पाटोदा इथं ८ वॉर्ड बिनविरोध, तर ३ वॉर्डांमध्ये निवडणूक झाली.

हिवरे बाजार :

हिवरे बाजारची ग्रामपंचायत तब्बल ३० वर्षं बिनविरोध राहिली. आता मात्र इथं ग्रामपंचायतची निवडणूक झाली. इथली ग्रामपंचायत ७ जण सदस्यांची असून सगळ्या जागांसाठी निवडणूक झाली.

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांची पुन्हा एकहाती सत्ता, सर्व जागा जिंकल्या आहेत. पोपटराव पवार यांच्या वॉर्डातील विरोधी उमेदवाराला ४४ मते तर पवारांचा २८२ मते घेऊन विजय झाला आहे.

राळेगण सिद्धी :

राळेगण सिद्धीत ३ वॉर्ड असून ९ सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. सद्यस्थितीला इथले २ उमेदावर बिनविरोध ठरले असून ७ जागांसाठी निवडणूक झाली. यात विद्यमान सरपंच लाभेष औटी यांच्या पॅनेलनं सगळ्या ७ जागांवर विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *