राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या शाखा सुरगाणाकडून आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न..

| नाशिक | काल दि 22/9/2021 रोजी नूतन विद्यामंदिर, सुरगाणा येथील सभागृहात सुरगाणा तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021 सोहळा पार पडला. या गुणवंत शिक्षक पुरस्कार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कॉम जे पी गावित हे होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती, सुरगाणा सभापती कॉम. इंद्रजित गावित होते. या कार्यक्रमासाठी जि प सदस्या सौ. ज्योती जाधव, पंचायत समिती सदस्य श्री एन डी गावित, माजी जि प सदस्य श्री सुभाष चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री राजू पवार, गट विकास अधिकारी श्री दीपक पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री धनंजय कोळी तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे स्वागत गीत संघटनेचे सरचिटणीस श्री तुकाराम अलबाड यांनी आपल्या सुमधुर आवाज व संगीताने केली. त्यांच्या या गीताने सर्व मान्यवर, अधिकारी, सत्कारार्थी, सर्व शिक्षक यांना सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करून टाकले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना राज्याध्यक्ष श्री भागवत धूम यांनी केले. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात चांगले पवित्र काम करणाऱ्या तालुक्यातील गुणवंत शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा आज सन्मान करणार आहोत असे सांगितले.

या कार्यक्रमात प्रथम जि प नाशिक चा गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021 तालुक्यातील जि प उच्च प्राथमिक शाळा सराड येथील उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक, अभ्यासू व शांत संयमी व्यक्तिमत्त्व गुणवंत शिक्षक श्री हरेराम मोहन गायकवाड सर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्प, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात आला.

सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षक यांना तालुक्यातील 23 केंद्रातील 23 शिक्षकांना व एक केंद्र प्रमुख, एक शिक्षण विस्तार अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांचाही गौरव करण्यात आला. तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021 देण्यात आला.

त्यांचे केंद्र , नाव व कार्यरत शाळा खालील प्रमाणे :

1) बोरगाव- श्रीम. सुलोचना बोरसे शाळा घोडांबे
2) मोहपाडा- श्री हिरामण गायकवाड शाळा- खडकी (उंड)
3) घागबारी- श्री केशव भोये शाळा- वटाबारी
4) बुबळी- श्री मधुकर गायकवाड शाळा- करवंदे
5)सालभोये- श्री दिगंबर चौधरी शाळा- केळुने
6) मानी-श्री लक्ष्मण बागुल शाळा- उंबरदे मा.
7) सुरगाणा- श्री झाबरु जोपळे शाळा बनपाडा
8) मालगव्हाण – श्री लक्ष्मण ठाकरे शाळा- निंबारपाडा
9) अलंगुण – श्री रामदास भोये शाळा- तोरणडोंगरी
10) आमदा- श्री राजकुमार चौधरी शाळा आमदा
11) धुरापाडा – श्री मोहन राठोड शाळा- खोबळा मा.
12) आंबाठा – श्री भास्कर झिरवाळ शाळा-
13) डोल्हारे – श्री लक्ष्मण चौधरी शाळा – खुंटविहीर
14) करंजुल (क)- श्री यशवंत बागुल शाळा- मांधा
15) उंबरठाण – श्री सतीश इंगळे शाळा – उंबरठाण
16) पांगारने – श्री विठ्ठल साबळे शाळा- फणसपाडा
17) पळसन- श्री विठ्ठल पाडवी शाळा- पळसन
18) मनखेड – श्री विष्णू इंगोले शाळा- हेमाडपाडा
19)हस्ते – श्री संजय बागुल शाळा- वांगणपाडा सु
20) बाऱ्हे- श्री अभिजित घुले शाळा- बाऱ्हे
21) आंबोडे- श्री सुभाष खंबाईत शाळा – केळावन
22) खोकरविहीर – श्री पुंडलिक चौधरी शाळा- खोकरविहीर
23) वाघधोंड- श्री परशराम गावित , शाळा- बंधारपाडा

या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्प, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच गुणवंत केंद्रप्रमुख म्हणून डोल्हारे केंद्राचे केंद्र प्रमुख श्री राजेंद्र बागुल व गुणवंत शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आंबाठा बीट शिक्षणविस्तार अधिकारी श्री भाऊसाहेब सरक यांचाही गुण गौरव करण्यात आला. तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री धनंजय कोळी यांचाही त्यांच्या कार्याबद्दल गुण गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे माजी आमदार कॉम.जे. पी. गावित यांनी सांगितले की आम्ही देखील अनंत अडचणीतुन त्यावेळी सोयी सुविधा नसताना शिक्षण घेतले आम्हाला घडवणारे ही गुरुजीच आहेत. आज शिक्षण घेऊन आपली मुलं कलेक्टर, तहसीलदार, बीडीओ, अधिकारी बनले पाहिजेत. तालुक्यात जे अधिकारी झाले त्यांची देखील उदाहरणे साहेबांनी सांगितली. तसेच खेळातही गुरुची साथ घेऊन राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय व ऑलिम्पिक पर्यंत झळकले पाहिजे. तसेच आपल्या सुरगाणा तालुक्यातील शिक्षक यांनी कोरोना काळात चेक पोस्ट ड्युटी, कोविड गाव सर्व्हे, मदतनिधी कार्य केले. याबरोबरच ओट्यावर शिक्षण, शिक्षक आपल्या दारी उपक्रमाने गुणवत्ता टिकवून ठेवली. त्यामुळे आज जि. प.शाळेकडे पालक आपल्या मुलांना जास्त पाठवत आहेत. आज आपण आयोजकांनी भूमीत कार्य करणाऱ्या शिक्षकांचा जो सन्मान करत आहात. हे खूपच उत्कृष्ट कार्य आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेचे मनापासून अभिनंदन व आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात सभापती कॉम इंद्रजित गावित यांनी सांगितले की, कोरोना काळात शिक्षकांनी केलेल्या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचले त्यामुळे तुम्ही सर्व अभिनंदनास पात्र आहात, येत्या काळात आम्ही पण पक्षा तर्फे कोरोना योद्धा पुरस्कार शिक्षक, डॉक्टर, आरोग्य सेवक, ग्रामसेवक व तलाठी यांचा सत्कार करणार आहोत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सर्व शिक्षक बांधवानी मार्गदर्शन करावे असे त्यांनी आवाहन केले व आजच्या गुण गौरव सोहळा आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना सर्व पदाधिकारी यांचे त्यांनी कौतुक केले. श्री. एन डी गावित यांनी सांगितले की, शिक्षकांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे, शिक्षकांनी तळागाळातील विद्यार्थी घडवून आपल्या आदिवासी समाजातील मुले अधिकारी, घडविले पाहिजे.

मा गटविकास अधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले की, सुरगाणा तालुका अतिदुर्गम असून सुद्धा येथे गुणवत्ता चांगली आहे तसेच अधिकारी प्रशासन समन्वय चांगले आहे. श्री कोळी यांनी सांगितले की, माझा हा सन्मान सर्व शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी यांचा आहे, तसेच आदिवासी शिक्षक संघटना यांनी हे पुरस्कार दिले त्यामुळे तळागाळातील विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी निश्चितच मदत होईल.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य संघटक श्री परशराम पाडवी, जिल्हाध्यक्ष श्री मोतीराम भोये, तालुका सहसरचिटणीस श्री गुलाब चव्हाण यांनी केले. तसेच संपूर्ण कार्यक्रमात सुमधुर संगीताने श्री अलबाड यांनी कार्यक्रमाची आणखी शोभा वाढविली व साउंड सिस्टीमसाठी विशेष लक्ष देऊन साउंड सिस्टिम उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राज्याध्यक्ष श्री.भागवत धुम, तालुकाध्यक्ष श्री भागवत चौधरी, जिल्हा संघटक श्री रविंद्र गायकवाड, श्री.मनोहर गांगुर्डे , उपाध्यक्ष श्री प्रकाश पाडवी व श्री नंदकुमार देशमुख, सरचिटणीस श्री तुकाराम अलबाड, सल्लागार श्री सोमनाथ पवार, कार्याध्यक्ष श्री अविनाश धूम, प्रसिद्धीप्रमुख श्री प्रवीण जाधव, महिला उपाध्यक्ष श्रीम इंदू बागुल, श्री पद्माकर गायकवाड, महिला संघटक श्रीम निलम साबळे, सहप्रसिद्धी प्रमुख श्री मनोज पवार, श्री सीताराम वळवी, श्री तुळशिराम देशमुख, श्री राणा चौधरी, श्री गणेश गायकवाड, श्री अनिल गांगुर्डे तसेच सर्व केंद्रप्रतिनिधी व संघटनेचे सर्व शिलेदार यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले.

” महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटने मार्फत सुरगाणा तालुक्यातील शैक्षणिक,सामजिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यापुढेही संघटना अश्याच पध्दतीने चांगले. कार्यक्रम घेऊन, शिक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी शिक्षकांच्या समस्या सोडवन्यासाठी कार्य करत राहील..”
– भागवत धुम(राज्याध्यक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *