आयपीएल 2024 : आयपीएल 2024 ला सुरुवात झाली असून हा सिझन मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी काही फारसा चांगला गेलेला दिसत नाही. या काळात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकंही सामना जिंकता आलेला नाही. सलग 3 पराभवानंतर टीमसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. टीमचा सर्वात उत्तम फलंदाज सूर्यकुमार यादव पूर्णपणे फीट झाला आहे. यावेळी तो मुंबई इंडियन्समध्येही सामील झाला असून सूर्या ७ एप्रिल रोजी दिल्लीविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहे.
या खेळाडूंचा पत्ता होणार कट?
सूर्यकुमार परतला तर प्लेईंग 11 मधून काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये अनुभवी लेगस्पिनर पियुष चावला, तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा नमन धीर, युवा वेगवान गोलंदाज क्वेना माफाका आणि स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस यांचा समावेश आहे. एकंदरीत पाहिलं तर या खेळाडूंना अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आगामी सामन्यात त्याला संधी मिळू शकते.
कोणाला मिळणार संधी?
रविवारी म्हणजेच 7 एप्रिल रोजी मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर खेळाडू मोहम्मद नबी, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा आणि लेगस्पिनर श्रेयस गोपाल यांचा समावेश केला जाऊ शकतो. या तिन्ही खेळाडूंनी आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही.
मुंबई इंडियन्स संघ पॉइंट टेबलमध्ये सर्वात खालच्या म्हणजेच 10 व्या स्थानावर आहे. मुंबईने या सिझनमध्ये आतापर्यंत केवळ घरच्या मैदानावर एक सामना गमावला आहे. त्यामुळे टीमला अजूनही पुढील 3 सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. दिल्लीनंतर हार्दिक पंड्याची टीम आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे.
सूर्यकुमार आल्यानंतर कशी असेल मुंबई इंडियन्सची टीम
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.