भारतीय जनता पार्टी सारखा सुसंस्कारी पक्ष जगाच्या पाठीवर दुसरा असूच शकत नाही. त्यांच्या एवढे चारित्र्यसंपन्न लोक अख्ख्या ब्रम्हांडात शोधून सापडणार नाहीत. त्यांच्या व्याख्या वेगळ्या, त्यांचे नियम वेगळे, त्यांचे कायदे वेगळे, त्यांची डिक्शनरी देखील वेगळी असते. त्यांच्या डिक्शनरीचा अर्थ लावता लावता त्यांचे स्पेशल देव देखील पागल होतील. म्हणूनच कोरोना काळात ते त्यांच्याही मदतीला धावून आले नसावेत !
तुम्ही कोणतंही पाप करा, भाजपात जा.. आणि पवित्र व्हा.. असा विश्वमान्य कायदा आहे. असं असतानाही धनंजय मुंडेंनी घोडचूक केली. भाजपा सोडून ते राष्ट्रवादीत आले. त्यामुळेच त्यांच्यामागे आता जुन्या भानगडी लागल्या आहेत. दुसरं लग्न म्हणा किंवा विवाहबाह्य संबंध म्हणा, ह्या गोष्टी भाजपा सोडून इतर पक्षातील लोकांसाठी फार मोठा गुन्हा आहे, याचं भान मुंडेना असायला हवं होतं !
भाजपा मधील लोकांसाठी मात्र ते विशेष मेरिट आहे. स्पेशल पॅकेज आहे..!
• मैत्रिणीचा नवरा पळवा – मंत्रिपद मिळवा ! सतीसावित्रीचा सन्मान मिळेल!
• प्रियकराची हत्या करा, बॉम्बस्फोट करा – खासदार व्हाल ! साध्वी, सन्यासी दर्जा कायम राहील !
• बायका पोरं असलेल्या नवऱ्यासोबत लग्न करा – पुन्हा पुन्हा खासदार व्हाल.
• बलात्कार करा, मंत्री व्हाल..! वगैरे वगैरे..
हा सारा मेन्यू धनंजय मुंडेना सुद्धा तोंडपाठ आहे. पण त्यांनी वेडेपणानं भाजपा सोडली आणि घात झाला. अन्यथा त्यांनी पक्षाची परंपरा सोडून काहीही वेगळं केलेलं नाही. आता हीच अधिकृत उदाहरणं बघा..
• धनंजय मुंडे भाजपचे होते, अटलबिहारी वाजपेयी सुद्धा भाजपचेच होते.
• मुंडे मंत्री आहेत, वाजपेयी पंतप्रधान होते.
• धनंजय मुंडे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याची त्यांनी स्पष्ट कबुली दिली. अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा तशी जाहीर कबुली दिली होती.
• या संबंधातून झालेल्या मुलांना मुंडे यांनी हिमतीनं स्वतःचं नाव दिलं, तेवढी हिम्मत बाजपेयी यांनी दाखवली नाही. त्याऐवजी त्यांनी दत्तक घेवून काम भागवलं.
मात्र तरीही मुंडे यांनी आघाडी सरकार पाडायला मदत करायला हवी होती. पण त्यासाठी बहुधा ते तयार झाले नसल्यामुळे शेवटी भाजपाच्या नियमाप्रमाणे गुन्हेगार म्हणून हिट लिस्टवर आलेत. जुनं प्रकरण बाहेर काढण्यात आलं. आणि आता भाजपचे सर्व पुण्यवान नेते ओरडून ओरडून मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत.
तथापि, मुंडे हे अस्सल मुंडे आहेत. त्यामुळे मंत्रिपद गेलं म्हणून लगेच बंगल्याच्या भिंतीवर वेडंवाकडं काही लिहून ठेवण्याचे उपद्व्याप ते करणार नाहीत किंवा बांगड्या फोडत महाराष्ट्रभर फिरणारही नाहीत.
तेव्हा,
भाजपा नेत्यांना जर खरंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा हवा असेल, तर..
• त्यांनी सर्वात आधी अटल बिहारी बाजपेयी यांचा ‘भारतरत्न’ हा सन्मान परत घ्यावा. ( कारण दोघेही एकाच परीक्षेत पारंगत झालेले आहेत. )
• भारतरत्न परत घेतल्यावर, त्याला प्रतिसाद म्हणून एका तासाच्या आत मुंडेही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील, याबद्दल मला शंका वाटत नाही. मी भाजपावाल्यांना तशी खात्री देतो !
• किंवा जर पक्षानेच ( चुकून ) मुंडे यांना राजीनामा मागितला, तर त्यानंतर तरी लाज राखायची म्हणून भाजपा बाजपेयी यांचे भारतरत्न परत घेण्याचा मर्दपणा दाखवतील का ? यावर भाजपने जाहीर खुलासा करावा. तोवर आम्ही वाट पाहू..
आम्हाला तशीही फार घाई नाही !
बघा, सोपा आणि सरळ मार्ग सांगितला..! झेपत असेल तर होऊन जाऊ द्या !
– ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर पार्टी
तुमच्या सारख्या चमचे लोकामुळे हे राजकारणी सोकावलेत
वाजपेयींशी तुलना करताना थोडी जनाची नाही तर मनाची ठेवायची ना भावा