शिक्षण क्रांतीच्या पाठपुराव्याला यश ठाणे जिल्हयातील पहिला अपघाती विमा रक्कम आज शिक्षक मित्राच्या वारसांना सुपुर्द..!

| भिवंडी | भिवंडीतील प.रा.विद्यालयातील शिक्षक सतिश पवार यांचे13 मे 21 रोजी अपघाती निधन झाले, त्यानंतर शिक्षण क्रांतीचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांच्या सुचनेनुसार पवार सरांच्या वारसांना 30 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवुन देण्याबाबत शिक्षण क्रांतीचे राज्यकार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर गोसावी व भिवंडी महानगर कार्यवाह योगेश वल्लाळ, बापुराव मोरे, सुरेश साळवे यांनी टिडिसीसी भिवंडी शाखेचे व्यवस्थापक दिपक मनेरा यांच्याशी चर्चा करुन आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन दिली व सातत्याने सदर प्रकरणाचा पाठपुरावा केला.

आज या सर्व प्रयत्नांना यश आले. टिडीसीसी बॅंकेने ठाणे जिल्हयातील पहिला अपघात विमा मंजूर करुन आज पवार सरांच्या पत्नी प्रतिभा पवार व कन्या उन्नती पवार यांच्याकडे रु. 30 लाखांचा चेक सुपुर्द केला. याप्रसंगी ठाणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक भाऊ कु-हाडे, संचालक व बॅंकेचे प्रशासकीय अधिकारी तसेच शिक्षण क्रांतीचे राज्याध्यक्ष सुधीर घागस सर, राज्यकार्यकारिणी सदस्य संदिप कालेकर, भिवंडी महानगर कार्यवाह योगेश वल्लाळ, किशोर राठोड, अतुल मिश्रा, राजेश कदम, साईनाथ म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या संपुर्ण प्रस्तावाचा योगेश वल्लाळ व संदिप कालेकर यांनी मोठा पाठपुरावा केला त्याबद्दल कुटूंबियांच्या वतीने पवार यांनी त्यांचे व शिक्षण क्रांती संघटनेचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.