टेस्ला कंपनी बंगलोर मध्ये, पेज ३ मंत्र्यांना झटका बसला, मनसेची खोचक टीका

| मुंबई | जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे. कंपनी इथे लक्झरी इलेक्ट्रिक कारची निर्मिती आणि व्यवसाय करणार आहे. बंगळुरुतील एका रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटसह कंपनी आपल्या कामाला सुरुवात करणार आहे.

पेज-3 मंत्र्यांना झटका : संदीप देशपांडे

महत्त्वाचं म्हणजे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या टीमसोबत 22 ऑक्टोबर 2020 रोजी प्राथमिक चर्चाही केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली होती. परंतु टेस्लाने महाराष्ट्रऐवजी कर्नाटकला पसंती देत बंगळुरुमध्ये नोंदणी केली. त्यानंतर आता मनसेने आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका. बोलाची कढी बोलाचा भात,” अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *