ठाणे शहरातील हॉस्पिटल्स, बेडस व्यवस्थेसह रुग्णवाहिकेची माहिती एकाच संपर्क क्रमांकावर उपलब्ध…

| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन / ठाणे | ओमिक्रॉन व्हेरियंट व कोव्हीड-१९च्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता शहरात उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती तात्काळ मिळण्यासाठी ठाणे महापालिकेची कोविड वॉर
अधिक सक्षम करण्यात आली असून नागरिकांनी +९१ ७३०६३ ३०३३० या वॅार रूमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड वॉर रूमने अधिक प्रभावीपणे काम केले आहे. सध्यस्थितीत ओमिक्रॉन व्हेरियंट व कोव्हीड-१९च्या पार्श्वभूमीवर कोविड वॉर रूम अधिक सुसज्ज ठेवण्यात आली आहे. वॉर रूमच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी +९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.

वॉर रूममध्ये +९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकाशी इतर २२ संपर्क क्रमांक जोडण्यात आल्याने नागरिकांना आता संपर्क क्रमांक बिझी असल्यामुळे कोणतीही प्रतीक्षा न करता तात्काळ संपर्क साधून उपलब्ध माहिती घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *