मुंबई दि.७ : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात निवडणूक होत आहे. यातील राजकीय परिस्थितीत पहिला गेले तर शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम सुरु असून महाराष्ट्राची प्रगती होत आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शननुसार व मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितप पवार यांच्या नेतृवखालील मजबूत होत असून लवकरच एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होण्याकडे वाटचाल सुरू असल्याचा असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज दि.०७ एप्रिल रोजी मुंबई बाळासाहेब भवन येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
डॉ.गोऱ्हे पुढे बोलताना विभागनिहाय लोक हिताच्या कामाची माहिती देताना म्हणाल्या की,
उद्योग आणि रोजगार
* राज्याचे नवे खनिज धोरण अंतिम टप्प्यात आहे. त्याचा विदर्भाला मोठा लाभ होणार आहे.
सुरजागड येथे १४ हजार कोटी आणि ५ हजार कोटींचे दोन नवीन प्रकल्प आणि स्टील प्लाण्टही उभारणार. त्यातून १० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
* चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कोळसा खनिजावरील आधारित Coal Gasification द्वारे हायड्रोजन आणि युरिया निर्मितीचा प्रकल्प २० हजार कोटींचा गुंतवणूक- १० हजार रोजगार
ऊर्जा
* विदर्भात ११ जिल्ह्यांत २५१७ मेगावॉट MW पावन उर्जा प्रकल्प उभारणीस वाव आहे.
समृद्धी महामार्गामुळे विदर्भ- मराठवाडा असे तीन टुरिझम सर्किट तयार करणार.
* अमरावती येथे पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात आले आहे.
* वस्त्रोद्योग धोरणातातील चार झोनमध्ये विदर्भाचाही एक झोन आहे.
* नागपूमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून ५ हजार कोटींचा निधी उभारणार
कृषी
* विदर्भ – मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनसाठी मूल्यसाखळ्या विकसित करतोय.
* धानाला दुप्पट बोनस – ६ लाख शेतकऱ्यांना १४०० कोटी मिळतील.
* संत्रा उत्पादकांसाठी संत्रा इस्टेट रोगमुक्त व दर्जेदार संत्र्याचे उत्पादन घेण्यात येईल.
* बांग्लादेशाला निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्काच्या पन्नास टक्के रक्कम अनुदान- १६९ कोटी ६० लाख एवढा निधी दिलाय.
दळणवळण
* पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग – ८६ हजार ३०० कोटी
* नागपूर मेट्रो रेलचा पहिला टप्पा सुरु. दुसऱ्या टप्प्याला मान्यता.
* समृध्दी महामार्ग – लवकरच अखेरचा टप्पा सुरू होणार गडचिरोलीपर्यंत मार्ग वाढविणार.
सिंचन
* विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी वाशीम तालुक्यात पेनगंगा नदीवर ११ बैरेजेस बांधण्यात आले आहेत. जिगाव प्रकल्पाला गती दिली आहे.
* वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ८३ हजार ६४६ कोटी खर्च येणार आहे. अमरावतीमधील १०० प्रकल्पांचे सुधारित नियोजन केले आहे. या प्रकल्पांना ६ हजार ७७७ कोटी खर्च अपेक्षित असून २०२३-२४ मध्ये सुमारे २१९२ कोटी तरतूद आहे
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास गेल्या वर्षी १५०० कोटी, जून २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार
विदर्भ आणि मराठवाड्यात बळीराजा जलसंजीवनी योजना राबविली जाते. त्यात ९१ प्रकल्पांचा समावेश आहे.
* प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत १० प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित १७ प्रकल्प जून २०२५ पर्यंत पूर्ण करीत आहोत.
पर्यटन, सामाजिक व लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय
* सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी निधी दिलाय.
* लोणार सरोवर पर्यटन विकासासाठी ३६९ कोटी रकमेच्या आराखड्यास मान्यता
* गोसीखुर्द येथे जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प. १०१ कोटींच्या प्रस्तावास मान्यता.
शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृवाखालील सरकारने जाहीर व अंलबजावणी केलेले पूर्व विदर्भातील लोकहिताचे कामे व विविध कार्यक्रम याची माहिती शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.