कंगना रणौतसोबत फोटोत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम ? काय आहे सत्य

बॉलिवूड  : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणूक २०२४ मधून राजकारणात एन्ट्री करत आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडीतून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अभिनेत्रीने राजकारणात एन्ट्री केल्यानंतर तिच्यावर अनेक विरोधी पक्षांकडून निशाणा साधला जात आहे. मागील काही दिवसांपासून कंगना सतत चर्चेत आहे. याचदरम्यान तिची एक फेक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगनाचा एका व्यक्तीसोबतचा रेस्टॉरेंटमधील एका जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कंगनासोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम (आर्काइव लिंक) असल्याचा दावा केला जात आहे. पण आता बूमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. हा फोटो २०१७ मधील आहे. तपासादरम्यान असं आढळून आलं, की कंगनासोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम नसून सिनेपत्रकार मार्क मॅन्युअल आहे.

बूमला आपल्या तपासात असं आढळून आलं, की कंगनासोबत दिसणारा व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम नाही. बॉलिवूड अभिनेत्रीसोबत फोटोत दिसणारा व्यक्ती सिनेपत्रकार मार्क मॅन्युअल आहे. त्यांनी १५ सप्टेंबर २०१७ रोजी (आर्काइव लिंक) आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. फेसबुकवर कंगनासोबतचा फोटो शेअर करत मार्क मॅन्युअलने लिहिलेलं, की हा फोटो काही महिन्यांपूर्वी मुंबईतील खार येथील कॉर्नर हाऊस नावाच्या एका रेस्टॉरेंटमध्ये घेण्यात आला होता. आम्ही आज प्रदर्शित होणाऱ्या कंगनाच्या सिमरन सिनेमाच्या सक्सेस पार्टीसाठी एका शॅम्पेन ब्रंचमध्ये होतो. कंगनाने वाईन तर मी बियर घेतली होती.

दरम्यान, कंगनाचा हाच फोटो सप्टेंबर २०२० मध्येही याच दाव्यासह व्हायरल झाला होता, त्यावेळी बूमने याचं फॅक्ट चेक केलं होतं. बूमने रिवर्स फोटो सर्च करुन हफ्फिंगटन पोस्टमध्ये २०१७ मध्ये छापलेले संपादकीय लेख काढले, त्यात हेच फोटो दिसतात. बूमने केलेल्या तपासात फेसबुक प्रोफाईल देखील तपासून पाहिलं, त्यावेळी हा फोटो १५ सप्टेंबर २०१७ रोजी अपलोड केल्याचं आढळून आलं आहे.

निष्कर्ष


बूमला आपल्या तपासात असं आढळून आलं, की कंगनासोबत फोटोत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम नाही. बॉलिवूड अभिनेत्री कंगनासोबत दिसणारी फोटोतील व्यक्ती पत्रकार मार्क मॅन्युअल आहे. हा फोटो खोट्या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *