| नवी दिल्ली / लोकशक्ती ऑनलाईन | केंद्र सरकारने कोरोना संक्रमित मुलांच्या उपचारासाठी नवीन गाइडलाइन जारी केली आहे. या नवीन नियमात संक्रमित मुलांवर सीटी स्कॅनचा वापर विचारपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आला असून, रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिशा-निर्देशांमध्ये एसिम्पटोमेटिक केस आणि सौम्य लक्षणे असल्यावर स्टेरॉयडच्या वापराला घातक म्हटले आहे. गाइडलाइनमध्ये सांगितल्यानुसार, 18 पेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या वापराबाबत योग्य आकडेवारी नसल्यामुळे इंजेक्शनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
गाइडलाइंसमध्ये मुलांसाठी 6 मिनीटांच्या वॉक टेस्टचा सल्ला देण्यात आला आहे. वॉक टेट्सदरम्यान मुलांच्या बोटावर पल्स ऑक्सिमीटर लावून मुलांना सहा मिनीटे चालण्यास सांगावे. यानंतर मुलांची ऑक्सिजन सॅचुरेशन लेव्हल आणि पल्स रेट चेक करावा. यामुळे हॅप्पी हाइपोक्सियाची लक्षणे कळू शकतात.
काय आहे हॅप्पी हाइपोक्सिया?
जानकारांनी सांगितल्यानुसार, कोरोना महामारी आणि ब्लॅक फंगसदरम्यान हॅप्पी हायपोक्सियादेखील घातक ठरत आहे. हा आजार डॉक्टरांसाठी नवे आव्हान बनला आहे. या आजारात कोरोना लक्षणे आढळत नाहीत, पण अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन रुग्णाचा मृत्यू होतो. डॉक्टरांचे म्हणने आहे की, हायपोक्सियात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. रुग्ण स्वतःला निरोगी समजतो, पण अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होते.
DGHS ने हॉस्पिटलमध्ये फक्त गंभीर रुग्णांना भरती करून कडक देखरेखीखाली स्टेरॉयडच्या वापराचा सल्ला दिला आहे. DGHS ने सांगितल्यानुसार, ‘स्टेरॉयडचा वापर योग्यवळी आणि योग्य प्रमाणात दिला जावा. तसेच, रुग्णाने स्वतः स्टेरॉयडचा वापर टाळावा.