
| नवी दिल्ली / लोकशक्ती ऑनलाईन | काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टूलकीतद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदमान करण्याचे काम करत आहे असा आरोप केला होता. त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच शाब्दिक टीका झाली होती. यावर ट्विटरने संबित पात्राच्या ट्विटवर कारवाई केली होती.
संबित पात्रा यांच्या ट्विटखाली ट्विटरकडून ‘मॅनिपुलेटेड मीडिया’ असं लिहिण्यात आलं होतं. एखादी माहिती, फोटो, व्हिडीओ किंवा पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत असेल आणि त्याला योग्य प्रकारे साभार देण्यात आला नाही तर, ट्विट त्याला मॅनिपुलेटेड मीडिया असा टॅग देतात. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणात ट्विटरला नोटीस दिली होती.
ट्विटरला नोटीस दिल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर आक्रमकपणे टीका केली आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपची खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली!’, असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.
दरम्यान, ट्विटर इंडियाच्या प्रमुखांचं उत्तर अस्पष्ट असल्यानं आम्हाला इथं यावं लागलं असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. यापूर्वी देखील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ट्विटर कंपनीला नोटीस पाठवली होती आणि मॅनिपुलेटेड मीडियाबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!