
| ठाणे | कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बॅंक योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
एमएमआर रीजन मध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ही गरज लगेचच्या लगेच भरून काढता येणे अवघड आहे. अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी श्री. शिंदे यांनी या ऑक्सिजन बॅंकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला पाच लिटर क्षमतेच्या १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असले तरी कालांतराने दहा लिटर क्षमतेचेऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येतील असे श्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन्स द्वारे हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन त्यातील नायट्रोजन वेगळा करुन रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्ष याच्या माध्यमातून ही सेवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील गरजू रुग्णापर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण दररोज ऐकत आहोत. अशात डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी सूरु केलेला हा उपक्रम निश्चितच पथदर्शी ठरेल असा विश्वास श्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
ऑक्सिजन बॅंकेच्या या लोकार्पण सोहळ्याला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.
गरजू कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी या ऑक्सिजन बँकेचा लाभ घेण्यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्यालय, मंगला हायस्कूल शेजारी, कोपरी ठाणे पूर्व येथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री