उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन

| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |  

                   प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधनाची गरज आहे यासाठी बालपणा मधूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित विषयाबाबत जनजागृती करत त्यांची जिज्ञासा वाढवली पाहिजे यामुळे विद्यार्थी अधिकाधिक या विषयाकडे आकर्षित होतील यामधून नवनवीन संशोधनाला चालना मिळेल व देशाच्या प्रगतीला हातभार लागत स्वयंपूर्ण होऊ शकतो याकरिता गावागावांमध्ये विज्ञान केंद्र उभारली गेली पाहिजे असे प्रतिपादन विज्ञान प्रसार नवी दिल्ली चे शास्त्रज्ञ अरविंद रानडे यांनी केले

                     भुसावळ येथे रामन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन अंतर्गत उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उषाबाई शंकर पाटील होत्या प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील नेहरू प्लॅनेटोरियम रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ जेजे रावल इस्रोचे एक्स सायंटिस्ट भरतभाई चानीयारा रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाऊंडेशनचे चेअरमन डॉक्टर चंद्रमौली जोशी भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार गणराया कन्स्ट्रक्शन चे विजय खाचणे, अचिव्हर्स अकॅडमीचे संचालक संदीपकुमार चौधरी, उषा फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप जावळे आदी उपस्थित होते.

                       कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर ऑनलाईन व ऑफलाईन एकत्रित कार्यक्रमावेळी विज्ञान केंद्राचे उद्घाटन डॉक्टर अरविंद रानडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सेंटरचे महाराष्ट्र डायरेक्टर सुनील वानखेडे यांनी सांगितले की, उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटर अंतर्गत शहरात विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट गणितासाठी रामानुजन मॅच क्लब तर शिक्षकांसाठी नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायन्स या तीन शाखांची स्थापना करून विज्ञान व गणिताचा प्रसार करण्यात येईल.

                        यावेळी गुजरात इथून अभिषेक बोरानिया यांनी भुसावळातील रिसर्च सेंटर कसे असणार यावर पीपीटी द्वारे माहिती दिली तर गुजरात इथून भगवानभाई यांनी एपीजे अब्दुल कलाम सायन्स सेंटरमध्ये सुरू असणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटी बाबत माहिती दिली.

साधी राहणी, उच्च विचार

                         डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा सहवास लाभला होता कोणतेही काम करतांना अपयश स्वतः स्वीकारले व यश मिळाल्यास ते दुसऱ्यांना देण्याचे मोठेपण कलांमामध्ये होते त्यांच्या गरजा अतिशय कमी होत्या तर देशासाठी काय करता येईल याचा सतत त्यांच्यामध्ये विचार सुर असे अतिशय साधी राहणीमान व उच्च विचार असल्याने ते सर्वांमध्ये लोकप्रिय झाले. – भरतभाई चनियारा वैज्ञानिकए, एक्स. सायंटिस्ट इस्रो

निस्वार्थ काम करा यश मिळेल.

                          समाजात आपण राहत असताना समाजाचे देखील आपण देणे लागतो यामुळे आपण ज्या क्षेत्रात आहोत तेथे विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी जे जे चांगले करता येईल तेथे केले पाहिजे भुसावळ शहरातील विज्ञान केंद्र हे भारतात नंबर एकचे विज्ञान केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. – डॉ. चंद्रमौली जोशी चेअरमन, रामन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात

                           या कार्यक्रमास अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, एस टी महामंडळाचे रिटायर्ड एम ई ओ मिठाराम सरोदे, रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष संजू भटकर, ग.स. सोसायटी मा. तज्ञ संचालक योगेश इंगळे, नूतन पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे, काँस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष समाधान जाधव, धीरज चौधरी सर, बापूदादा चौधरी, शैलेंद्र भंगाळे साहेब, भूषण झोपे सर, मिनाक्षी जावळे, वंदना भिरुड मॅडम, निलाक्षी महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमात शिवम भंगाळे, यज्ञेश भिरुड, सानिका चौधरी, अमृता इंगळे, प्रेरणा सोनवणे, मयंक चौधरी, अथर्व इंगळे, पौरस वानखेडे, आदित्य महाजन, रोहन सोनवणे, पुष्कर सपकाळे, पार्थ वानखेडे, वेदांशू फेगडे या छोट्या कलामांनी प्रात्यक्षिके सादर केलीत.

                              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NCTS चे नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील यांनी तर आभार उषा सेंटरचे चेअरमन जीवन महाजन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.