वसमत विधानसभेचे आ. चंद्रकांत (राजूभैया) नवघरे यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तर्फे सत्कार; मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना न्याय मिळवून देण्याची केली विनंती..

| हिंगोली | वसमत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजूभैया नवघरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांचा नवीन परिभाषित निवृत्ती योजना अंतर्गत कपात झालेल्या रक्कमेचा हिशोब जो गेल्या आठ वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही जिल्हा परिषद मार्फत प्रलंबित होता, तो आपल्या कार्य तत्परतेने सदरील प्रश्न मार्गी लावून हिशोब पूर्ण करून दिला. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन हिंगोली यांच्यातर्फे आमदार साहेबांचा सत्कार करण्यात आला..

तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने शिक्षकांसाठी लागू केलेली एनपीएस योजना आणि सदर योजनेअंतर्गत शिक्षकांना ग्रॅच्युईटी (उपदान) व फॅमिली पेन्शन अशा सोयी सुविधा देण्यात याव्यात. त्यामधून 2005 नंतर सेवेत लागलेल्या परंतु मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनातर्फे मदत मिळवून द्यावी. अशा मागणीचे निवेदन आमदार साहेबांना देण्यात आले.

आमदार साहेबांनी सदरील मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले तसेच शिक्षकांनी आपली सर्व कर्तव्य व्यवस्थित पार पाडणे विषयी सूचित केले.

याचबरोबर राजूभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान वसमत मार्फत घेण्यात येणाऱ्या नवोदय विद्यालय सराव परीक्षेची संधी जास्तीत जास्त मुलां पर्यंत पोहोचवावी आणि मतदार संघातील जास्तीत जास्त मुलांना आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात अशा सूचना केल्या. याप्रसंगी राज्य समन्वयक अमोल शर्मा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा संघटक गंगाधर हरणे, वसमत तालुका अध्यक्ष उद्धव दाभाडे याच बरोबर सर्व वसमत तालुक्यातील संघटनेच्या शिलेदारांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.