विदर्भाच्या प्रश्नावर लग्न न करण्याची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय गांभीर्याने घ्यावे? – बाळासाहेब थोरात

| मुंबई | स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू होत. नागपूरच्या व्हेरायटी चौक इथं भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचं आरक्षण परत आणून दाखवतो. जर असं करून दाखवलं नाही तर राजकीय संन्यास घेईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

मात्र यानंतर यावर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. ‘देवेंद्र फडणवीस याचं विधान तुम्ही फार गांभीर्यानं घेतले. या आधीही त्यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असे म्हटलं होते’.

‘देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे, धनगर समाजाला सांगितले होते. पण पहिल्या बैठकीतही नाही व पाच वर्षातही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. ते फक्त दिशाभूल करत गेले. सत्तेसाठी वारेमाप बोलायचे आणि वाट्टेल ते आश्वासन द्यायचे. नंतर मात्र ते कृतीतून करायचे नाही, असा अनुभव भाजपचा आपल्याला आधीपासूनच आहेच. जनमाणसाला फसवणे आणि सत्ता मिळवणे हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात,’ अशी टीका थोरात यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.