विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्‍ट ; मंठा पोलिसांची दंडात्मक कारवाई..!

| जालना / लोकशक्ती ऑनलाईन | कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी आणि नगरपंचायतीने गुरुवारी संयुक्तपणे कारवाई केली. यामध्ये नगरपंचायतच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या साठ नागरिकांकडून 9,800 रुपये वसूल करण्यात आले. तर विनापरवाना वाहने घेऊन फिरणाऱ्या तीस जणांकडून पोलिसांनी 6,000 रुपये दंड वसूल केला.

विशेष म्हणजे गुरुवारी दिवसभरात 526 जणांची कोरोना अँटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यातील एक जण घनसावंगी येथील असून दोन ग्रामीण भागातील आहेत. शहरातील संत तुकाराम नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर, मंठा चौफुलीवर पोलिसांनी आज दिवसभर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी विरुद्ध मोठी कारवाई केली. विनापरवाना वाहने चालवणाऱ्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. आजच्या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक यशवंत बागुल, मुख्याधिकारी सतिश कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.दिपक लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई करण्यात आली.

या पथकात पोलीस उननिरीक्षक नितिन गट्टुवार, अस्मान शिंदे, पोहे काॅ.दिपक आढे, श्याम गायके प्रशांत काळे नगरपंचायत कर्मचारी सुधाकर खैरे, जावेद कुरेशी , जर्नादन भाग्यवान, वैद्यकीय अधिकारी डॉ.घुले आरोग्य सहाय्यक दत्ता सरकटे , सुजीत वाघमारे, आरोग्य सेवक रणजित देशमुख, वसंत गायकवाड, किरण मोरे, गोविंद नवले, सचिन सोनवणे, मोहन शेळके आदींचा समावेश होता.

मंठा शहरात विनाकारण व विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असुन अॅन्टीजन तपासणी देखील करण्यात येत आहे. तरी कोरोना साथरोगच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने घालुन दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *