#ViralPost : कोरोना संपल्यानंतर हे नक्की होणार..!

कोरोना संपल्यानंतर अपघाती व अकस्मात मृत्यू वाढणार..!

मथळा वाचून आश्चर्य वाटू देऊ नका. सध्या सुरू असलेला कोरोनाचा काळ लवकरच संपणार आहे. मात्र त्या नंतर महामारी खऱ्या अर्थाने सुरू होणार, अपघात व आकस्मिक मृत्यूचे प्रमाण अधिक वाढणार आहे हे निश्चित! त्याचे कारण म्हणजे सध्याचे कोरोना काळात सामान्य माणसांना पिळणारे,
लोकांच्या असाह्यतेचा फायदा घेणारे यांच्या नोंदी परमेश्वर घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने समावेश असणारे लोक खालीलप्रमाणे असतील..!

✓ कोरोना रुग्णांना अवास्तव बील आकारणी करणारे..
✓ ऐन वेळी अडवणूक करून अवास्तव भाडे मागणारे अॅम्ब्युलन्स चालक..
✓ इंजेक्शन, ऑक्सिजनचा काळाबाजार करणारे.
✓ मी बेड मिळवून देतो म्हणून हॉस्पिटलची एजंटगिरी करून कमिशन घेणारे.
✓ हॉस्पिटलमध्ये पॉलिसीचे पैसे उकळण्यासाठी अनावश्यक उपचार करणारे.
✓ बोगस रिपोर्ट बनून रोगाची तीव्रता वाढून लोकांना घाबरून देणारे.
✓ सामान्य माणसांच्या मजबुरीचा फायदा घेऊन चढ्या भावाने किराणा,भाजीपाला,व जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे.
✓ नावाला कोविड सेंटर चालू करून लोकांची लूट करणारे.
✓ औषधे चढ्या भावाने विकणारे.
✓ टी आर पी वाढवण्यासाठी खोट्या बातम्या बनवणारे व देणारे.
✓ या संकट काळात राजकारण करणारे.

✓ आणि असे इतर सर्व जे या संकट काळात नीच पणाचे काम करत आहेत.

आपण यात नाही ना?
असाल तर वेळीच भानावर या सामान्य लोकांचा तळतळाट घेऊ नका!

या कोरोनातून वाचाल कदाचित!

मात्र नंतर तुमचा नायनाट अटळ आहे..!

( सदरचा संदेशाशी दैनिक लोकशक्ती सहमत असेलच असे नाही. या सदरात सध्या सोशल मीडियात अधिक व्हायरल होणारा हटके संदेश समाविष्ट केला जातो..)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *