| मुंबई | महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, समाज कल्याणासाठी समर्पित असणारे व्यक्तिमत्व युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. विशाल भुजबळ ( सदस्य,रेल्वे मंत्रालय,भारत सरकार ) यांनी मुंबई स्थित आरएसएस कार्यालय, यशवंत भवन मध्ये डॉक्टर इंद्रेश कुमार जी, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, आरएसएस, यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी गौरक्षा, युवा सबलीकरण तसेच पर्यावरण संरक्षण व अन्य विषयांवर विस्तृत चर्चा केली व श्री.भुजबळ यांनी स्वतःच्या गौरक्षा व देशातील युवा वर्गाच्या सबलीकरणाच्या हेतूने चालू असणाऱ्या विविध सामाजिक कार्यांची, उपक्रमांची माहिती त्यांना दिली.
विविध सामाजिक उपक्रमांबरोबरच गेल्या काही वर्षापासून श्री. विशाल भुजबळ हे गाईंचं संरक्षण व त्यांच्या संगोपनासाठी निष्ठेने कार्यरत आहेत. वृद्ध व सोडून दिलेल्या भाकड गाईंना आसरा देऊन त्यांच्या पालनपोषणाची व योग्य त्या वैद्यकीय उपचाराची सोय गो-शाळेमार्फत उपलब्ध करून देतात, आतापर्यंत श्री. विशाल भुजबळ यांनी अशा हजारो गाईंचे संरक्षण, संवर्धन करून आजच्या युवकांसमोर भारतीय समाज आणि संस्कृती यांचे आदर्शवत उदाहरण प्रस्तुत केले आहे.
नुकताच त्यांना त्यांच्या सामाजिक उत्थानाच्या कार्याबद्दल दिल्ली येथे “भारत युवा पुरस्कार २०२१” ने सन्मानित झाल्याबद्दल डॉक्टर इंद्रेश कुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले व म्हणाले ” विशाल यांच्या सारख्या युवकांच्या हातानेच देशाचा विकास होऊ शकतो व देशाचे भविष्य तेच ठरवू शकतात. युवकांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने उपयोग झाला तर विविध क्षेत्रांमध्ये देशाची प्रगती अतिशय वेगाने होऊ शकते. आपणच आपला धर्म आणि संस्कृती यांची रक्षा करू शकतो.गौ रक्षणासाठी श्री.विशाल भुजबळ यांचे हे प्रयत्न बघून मला अतिशय आनंद होत आहे.”
यशवंत भवन येथे झालेल्या या विस्तृत बैठकी बद्दल डॉक्टर इंद्रेश कुमार यांचे आभार व्यक्त करताना श्री. विशाल भुजबळ यांनी असे म्हटले की “डॉक्टर इंद्रेश कुमार यांची भेट होणे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. गौरक्षा, युवा सबलीकरण, पर्यावरण संरक्षण या बरोबर अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करता आला तसेच विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन घेता आले,त्यामुळे मला आता अधिक सहज व प्रेरित झाल्याचा अनुभव होत आहे ” युवकांना आपले विचार, धोरणे व्यक्त करण्यासाठी, आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवून आणण्यासाठी योग्य त्या मंचाची गरज आहे,कारण आपल्या देशातील प्रतिभा हाच आपल्या देशाचा अनमोल वारसा आहे.आपल्याला देशातील युवकांना शिक्षण, सेवा व राष्ट्र निर्माणासाठी च्या कार्यात सहभागी करून घेतलं पाहिजे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी “ग्रीनडॉट फॉउंडेशन व मल्टिपर्पज ऑर्गनायजेशन” ची स्थापना केली आहे, ज्याचा एकमात्र उद्देश लोकांना पर्यावरणाबद्दल जागरूक करून त्यासाठी प्रेरित करणे हा आहे, याचाच एक भाग म्हणून दरवर्षी पावसाळ्यात हजारो झाडे ते लावतात.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .