एका मताने पडलेलं अटलबिहारी वाजपेयी सरकार, कोण होते ते खासदार ज्यांच्यामुळे कोसळलेलं १३ महिन्यांचं सरकार

मुंबई : देशात अशा अनेक अशा राजकीय घटना घडल्या आहेत, ज्या कित्येक वर्षांनंतर आजही अनेकांच्या लक्षात आहेत. असाच एक किस्सा आहे अटलबिहारी वाजपेयी यांचा. अटलबिहारी वाजपेयी यांचं १३ महिन्यांचं सरकार केवळ एका मताने पडलं होतं. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी देशाचे १०वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळत होते. पण एका खासदाराच्या मताने १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं.

अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९८ मध्ये दुसऱ्यांदा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. पण १३ महिन्यांनंतर, १७ एप्रिल १९९९ रोजी, सरकार केवळ एका मताने लोकसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयशी ठरलं. त्यावेळी राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा होती.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये पंतप्रधानांचे स्वीय सचिव असलेले शक्ती सिन्हा यांनी त्यांच्या ‘द इयर्स द चेंज्ड इंडिया’ या पुस्तकात त्या काळाशी संबंधित अनेक कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या पुस्तकात त्यांनी अनेक नेत्यांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्या पाठिंब्यानंतर अटल सरकार एका मताने पडलं होतं.

यापैकी एक नाव समोर येतं ते अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या जे. जयललिता यांचं. आपला पाठिंबा काढून घेतल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार अल्पमतात गेलं आणि नंतर लोकसभेत विश्वासदर्शक ठराव गमावला असल्याचं म्हटलं जातं.

वाजपेयी सरकार पाडण्यासाठी तत्कालीन काँग्रेस खासदार गिरधर गमांग आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सैफुद्दीन सोझ हे त्या एका मताला जबाबदार होते, असा उल्लेख चर्चेत आहे. अटल सरकार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फारुख अब्दुल्ला यांनी सैफुद्दीन सोझ यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

१७ एप्रिल १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयी सरकारला लोकसभेत बहुमत सिद्ध करायचं होतं, पण त्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या समर्थनार्थ २६९ मतं मिळाली होती. तर विरोधात २९० मतं पडली होती. १३ महिन्यांच्या अल्प कालावधीत विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर भाजपच्या वाजपेयी सरकारने राजीनामा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *