| मुंबई | कोरोना विषाणूनं साऱ्या जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आणि त्याचे थेट परिणाम हे जीवशैलीवर झाले. सर्वच सवयी पुरत्या बदलल्या आणि अनेकांना या बदललेल्या जीवनशैलीमध्ये समतोल राखण्यात बराच वेळही दवडावा लागला. अगदी काम करण्याच्या सवयींपासून एखादी गोष्ट आणण्यासाठी बाहेर जाण्याच्या सवयींमध्ये काही नवे नियम जोडले गेले. दैनंदिन आयुष्यात कार्यालयात जाऊन काम करण्यावरही निर्बंध आले आणि सुरुवात झाली Work From Home ची.
गेल्या कित्येत महिन्यांपासून Work From Home सुरु आहे, पण यातच अनेकांना अस्वस्थताही येऊ लागली आहे. Work From Home आता आपल्या जीवनशैलीचाच एक भाग असून, त्याचा सकारात्मकपणे स्वीकार करत आरोग्याचीही कशी काळजी घेता येईल यासाठीच्या काही खास टीप्स, खालीलप्रमाणे..
✓ स्वयंपाकघरानजीक काम करु नका :
तुमचं वर्कस्टेशन म्हणजेच काम करण्याचं ठिकाण घरात स्वयंपाकघरापासून दूर असावं. ज्यामुळं तुमचं लक्ष विचलित होण्याची संधी तशी कमीच मिळेल.
✓ आहाराच्या वेळा ठरवा :
ज्या प्रकारे तुम्ही झोपण्याची, व्यायामाची, कामाची वेळ ठरवता त्याचप्रमाणं आहाराचीही वेळ निर्धारित करा. नोकरीच्या ठिकाणी वेळच्या वेळी तुम्ही जसं काहीतरी खात असता तिच सवय घरीही ठेवा.
✓ खाणं टाळू नका :
अनेकदा कामाच्या व्यापात बराच वेळ जातो आणि पुढ्यात असणारं खाणंही आपण विसरुन जातो. पण, ही सवय मुळीच चांगली नाही. भूक लागेल तेव्हा खाणं कधीही उत्तम. गरज असल्यास मोबाईल टाईमरचा वापर करत खाण्याची वेळ आणि सवय अंगी बाणवा.
✓ संतुलित आहाराला प्राधान्य द्या :
घरच्या घरी असल्यामुळं खाण्याच्या सवयींवरही ताबा ठेवा. खाण्यामध्ये सर्वच पोषक द्रव्यांचा समतोल कसा राखला जाईल यावर भर द्या. संतुलित आहाराचा फायदा शरीराला होतो आणि सोबतच मनावरही त्याचे परिणाम दिसून येतात.
✓ भरपूर पाणी प्या
पाणी प्यायल्यामुळं शरीराचा थकवा दूर होतो आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवत नाही. ज्याप्रमाणं ऑफिसमध्ये टेबलवर पाण्याची बाटली ठेवता त्याचप्रमाणं घरीही काम करताना बाजूला पाण्याची बाटली भरुन ठेवा.
✓ कॅफिनचं सेवन कमी करा
चहा- कॉफी घेत काम करण्याला अनेकांची पसंती असते. पण, याचं प्रमाणाबाहेर सेवन धोक्याचं आहे. यामुळं डोकेदुखी, पचनास त्रास आणि अस्वस्थताही वाढते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .