| नवी दिल्ली | देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत असंख्य जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. एकीकडे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. तर, दुसरीकडे या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. त्यातच १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणांनादेखील लसीकरण उपलब्ध झालं आहे. त्यामुळे, मोठ्या संख्येने सध्या तरुण त्यांच्या जवळील लसीकरण केंद्रांचा शोध घेत आहे. यामध्येच, MyGo कोरोना हेल्पडेस्कच्या माध्यमातून आता घर बसल्या व्हॉटस् अॅपवर आपल्याला जवळील लसीकरण केंद्राची माहिती मिळणार आहे.
MyGovIndia ने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर एक पोस्ट शेअर करत सविस्तर माहिती दिली आहे. आपल्या घराजवळील लसीकरण केंद्राची माहिती हवी असल्यास युजर्सला 9013151515 या क्रमांकावर ‘नमस्ते’ हा इतकाच मेसेज पाठवावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या चॅटबॉक्समध्ये काही क्षणातच कोविड लसीकरण केंद्र व लसीकरणाविषयी सविस्तर माहिती मिळेल. तसंच नमस्ते मेसेज करण्यासोबतच तुम्हाला तुमचा पिनकोडदेखील टाकावा लागेल. विशेष म्हणजे हा हेल्प डेस्क हिंदी व इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. MyGovIndia ने केलेल्या पोस्टमध्ये याविषयी सविस्तर माहिती व पद्धत देण्यात आली आहे.
भारत सरकारने कोरोना विषाणूसंदर्भातील माहिती उपलब्ध होण्यासाठी २०२० मध्ये चॅटबॉटची सुरुवात केली आहे. या हेल्पडेस्कच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीस कोरोना लसीकरण, कोविड सेंटर वा कोरोनाशी संबंधित प्रत्येक माहिती सहज उपलब्ध होते.
दरम्यान, चॅटबॉटसोबतच आरोग्य सेतू अॅप, कोविड सर्व्हिस पोर्टल किंवा उमंग अॅप या अॅपच्या माध्यमातूनही लसीकरणासाठी नोंदी करु शकता.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .